शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षकांना विश्रांती कक्ष

By admin | Updated: July 27, 2015 00:04 IST

शिवाजी विद्यापीठ : बिनतारी संदेश यंत्रणाही पुरविल्या

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांसाठी विश्रांती कक्षाची सुविधा प्रशासनाने पुरविली आहे. त्यात विद्यापीठ कॅम्पस्मधील दोन निवासस्थाने उपलब्ध करून दिली आहेत. त्यासह सुरक्षा अधिक चांगल्या पद्धतीने राबविता यावी यासाठी गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने सुरक्षा रक्षकांना बिनतारी संदेश यंत्रणा (वॉकीटॉकी) दिल्या आहेत.संपर्क साधण्याची तोकडी यंत्रणा, अपुऱ्या सुविधा, कमी मनुष्यबळ आणि विश्रांतीसाठी स्वतंत्र कक्ष नाही, अशा असुविधांच्या गर्तेत सापडलेल्या विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांची व्यथा ‘लोकमत’ने २० जुलैच्या अंकात ‘विद्यापीठाची सुरक्षा असुविधांच्या गर्तेत’ या वृत्ताद्वारे मांडली. त्यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत सुरक्षा रक्षकांना विद्यापीठ कॅम्पस्मधील प्राध्यापकांसाठी असलेल्या निवासस्थानांमधील दोन निवासस्थाने विश्रांती कक्षासाठी उपलब्ध करून दिली आहेत. त्यात आठ खोल्या आहेत. आणखी एक निवासस्थान येत्या आठवड्याभरात उपलब्ध करून दिले जाणार आहे, तसेच एखाद्यावेळी तातडीने संपर्क साधण्यासाठी सुरक्षा रक्षकांना सुमारे दीड लाख रुपयांचे पाच वॉकीटॉकीचे संच दिले आहेत. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार, तंत्रज्ञान विभाग, प्रवेशद्वार क्रमांक एक आणि आठ याठिकाणी सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. सुरक्षा विभागातील मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यात पहिला टप्पा म्हणून येत्या दोन दिवसांत नवीन १५ सुरक्षा रक्षक रूजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, याबाबत कोल्हापूर जिल्हा माजी सैनिक कल्याण संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर म्हणाले, गेल्या १५ वर्षांपासून सुविधांसाठी सुरक्षा रक्षकांचा समितीच्या माध्यमातून लढा सुरू आहे. त्याला ‘लोकमत’ने बळ देत यश मिळवून दिले. विद्यापीठ प्रशासनाने विश्रांती कक्ष आणि वॉकीटॉकी देऊन सुरक्षा रक्षकांना सुविधा पुरविण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. विश्रांती कक्ष आणि वॉकीटॉकीच्या सुविधेमुळे अधिक चांगल्या पद्धतीने सुरक्षा रक्षकांना काम करता येईल. अन्य मागण्यांची प्रशासन लवकर पूर्तता करेल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)