गडहिंग्लजच्या घाळी महाविद्यालयात महारक्तदानाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 19:00 IST2021-07-12T18:41:33+5:302021-07-12T19:00:09+5:30

Lokmat Event BloodDonation Kolhapur : लोकमतच्या महारक्तदान अभियानाला शहरातील डॉ. घाळी महाविद्यालयाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक मिळून २० जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तसंकलनासाठी येथील आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँकेने सहकार्य केले.

Response to blood donation at Ghaling College, Gadhinglaj | गडहिंग्लजच्या घाळी महाविद्यालयात महारक्तदानाला प्रतिसाद

गडहिंग्लज येथील डॉ. घाळी महाविद्यालयात ह्यलोकमतह्णतर्फे रक्तदान शिबीर झाले. याप्रसंगी डॉ. सतीश घाळी, प्राचार्य मंगलकुमार पाटील, संजय पाटील, शिवाजीराव भुकेले, राम मगदूम, अनिल उंदरे, संतोष बाबर, विकास अतिग्रे, अश्विन गोडघाटे आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देगडहिंग्लजच्या घाळी महाविद्यालयात महारक्तदानाला प्रतिसाद २० पिशव्या संकलन : दत्तक ६ गावातही होणार शिबीर

गडहिंग्लज : लोकमतच्या महारक्तदान अभियानाला शहरातील डॉ. घाळी महाविद्यालयाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक मिळून २० जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तसंकलनासाठी येथील आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँकेने सहकार्य केले.

लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा आणि विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक स्व. डॉ. एस. एस. घाळी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर पार पडले.

प्रारंभी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी व लोकमतच्या वितरण विभागाचे उपसरव्यवस्थापक संजय पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजनाने शिबीराचे उद्घाटन झाले.
डॉ. घाळी म्हणाले, ह्यलोकमतह्णने कोरोना महामारीच्या काळात हाती घेतलेला महारक्तदानाचा उपक्रम कौतुकास्पद व जीवनदायी आहे.

प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, महाविद्यालयातर्फे दत्तक घेतलेल्या लिंगनूर काानूल, बेकनाळ, बड्याचीवाडी, शेंद्री, हनिमनाळ व शिंदेवाडी या गावातही रक्तदान शिबीर घेणार आहोत.

लोकमतचे उपसरव्यवस्थापक पाटील म्हणाले, लोकमतच्या महारक्तदान अभियानात ११ दिवसात ३१ हजार पिशव्या रक्तसंकलन झाले आहे. त्याला राज्यभरातून मिळणारा प्रतिसाद पाहता ५१ हजार पिशव्या रक्तसंकलनाचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होईल.

यावेळी लोकमत गडहिंग्लज विभागीय कार्यालय प्रमुख राम मगदूम, वितरण अधिकारी धनाजी पाटील व अवधूत पोळ, बातमीदार शिवानंद पाटील, प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. संतोष बाबर, प्रा. निलेश शेळके, प्रा. डॉ. दत्ता पाटील, अश्विन गोडघाटे, डॉ. सुभाष पाटील, राजू कुंभार आदी उपस्थित होते. प्रा. अनिल उंदरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विकास अतिग्रे यांनी आभार मानले.

 

Web Title: Response to blood donation at Ghaling College, Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.