शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिलासा

By admin | Updated: September 15, 2014 00:01 IST

वेतनवाढ देण्याचे आदेश : वेतनवाढ न देणाऱ्या ग्रामपंचायतींवर होणार फौजदारी

दत्तात्रय पाटील-- म्हाकवे -ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन व राहणीमान भत्ता वाढविण्याचा निर्णय होऊन वर्ष उलटले तरीही प्रत्यक्षात वाढीव वेतन या कर्मचाऱ्यांना मिळत नव्हते. याबाबत शासनस्तरावर लेखी तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार ज्या ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळत नाही, अशा ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह ग्रामसेवक, पंचायत समितीतील संबंधित अधिकाऱ्यांवर कामगार कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शासनाने तसे स्पष्ट आदेशच जारी केल्याने राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना गणरायाचा गोडधोड प्रसाद मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या वेतनवाढीच्या अंमलबजावणी आदेशामुळे कर्मचारी वर्ग मनोमनी सुखावला आहे. यामुळे राज्यातील सुमारे ५५ हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन व राहणीमान भत्ता देण्यासंबंधी शासननिर्णय झाला. शासनाने हा निर्णय घ्यावा, यासाठी कर्मचाऱ्यांसह श्रमिक संघ अनेक दिवसांपासून लढा देत आहे. त्याची दखल घेत शासनाने गतवर्षी वरील निर्णय घेतला. मात्र, ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत अद्याप अंमलबजावणीच केलेली नव्हती.याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, श्रमिक संघ पुणे श्रमिक संघाचे सरचिटणीस व महादेव पवार (ता. पलूस, जि. सांगली) यांनी या कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन व राहणीमान भत्ता मिळत नसल्याची तक्रार केली होती. विशेष बाब म्हणजे ७ आॅगस्ट २०१३ ला वेतनवाढीचा निर्णय झाला आणि शासनाने डिसेंबर २०१३ पर्यंत वाढीव तरतूदही वितरित केली आहे. तरीही गटविकास अधिकाऱ्यांकडून याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती. मात्र, उशिरा का असेना, या कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन व राहणीमान भत्ता मिळत नसल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यामुळे शासनाने याबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतल्यामुळे कर्मचारी सुखावले आहेत.शासनाने डिसेंबर १३ पर्यंतची संपूर्ण तरतूद संबंधित पंचायत समितीकडे वितरित केली होती. परंतु, संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांपर्यंत ही तरतूद पोहोचलीच नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापूर्वीच्या तरतुदीप्रमाणे सुधारित किमान वेतन वितरित केलेल्या ग्रामपंचायतींनाच पुढील तरतूद वितरित करण्यात येणार असल्याचेही ग्रामविकास मंत्रालयातील कक्ष अधिकारी शि. फ. लांडगे यांनी नमूद केले आहे.पदपूर्वीचे सुधारित वेतनवेतनलिपिक३०००६३००पाणीपुरवठा २१००५६००झाडू नोकर१८००५२००