कोल्हापुरात प्रजासत्ताक दिन समारंभ शाहू स्टेडियमवर नाही तर, यंदा 'या'ठिकाणी होणार, कारण काय.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:35 IST2026-01-24T16:33:39+5:302026-01-24T16:35:15+5:30

‘जागर अंबाबाईचा’ हा कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरणार

Republic Day celebrations in Kolhapur will be held here this year instead of at Shahu Stadium, why? Read | कोल्हापुरात प्रजासत्ताक दिन समारंभ शाहू स्टेडियमवर नाही तर, यंदा 'या'ठिकाणी होणार, कारण काय.. वाचा

संग्रहित छाया

कोल्हापूर : दरवर्षी २६ जानेवारी रोजी शाहू स्टेडियम येथे आयोजित केला जाणारा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य समारंभ यावर्षी पोलिस परेड ग्राउंड, कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आला आहे.

शाहू स्टेडियम येथे नव्याने फुटबॉलसाठी गवताची लागवड करण्यात आली आहे. या गवताची वाढ पूर्णपणे न झाल्याने प्रशासनाने जागेत बदल केला आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, पोलिस गृहविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शाहू स्टेडियम व्यवस्थापक यांनी पाहणी करून जागेत बदल सुचविला.

प्रजासत्ताक दिनी दोन हजार विद्यार्थ्यांची संगीत कवायत आणि उषाराजे हायस्कूलचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आलेला ‘जागर अंबाबाईचा’ हा कार्यक्रम मुख्य समारंभाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. मुख्य समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे.

Web Title : कोल्हापुर में गणतंत्र दिवस: स्टेडियम की घास के कारण बदला स्थल!

Web Summary : कोल्हापुर में गणतंत्र दिवस समारोह पुलिस परेड ग्राउंड में होगा, क्योंकि शाहू स्टेडियम में नई घास लगाई गई है। कार्यक्रम में छात्र ड्रिल और 'जागर अंबाबाई' कार्यक्रम प्रमुख आकर्षण होंगे, जिसका उद्घाटन मंत्री प्रकाश आबिटकर करेंगे।

Web Title : Republic Day in Kolhapur: Venue Changed Due to Stadium Grass!

Web Summary : Kolhapur's Republic Day celebration moves to Police Parade Ground due to new grass at Shahu Stadium. The event, featuring a student drill and 'Jagar Ambabai' program, will be inaugurated by Minister Prakash Abitkar.