शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर हद्दवाढीतील गावांच्या सुविधांचा अहवाल महापालिकेला सादर, जिल्हा परिषदेकडून प्रक्रिया पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:24 IST

काय आहे अहवालात..

कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडून संभाव्य हद्दवाढीतील आठ गावांबाबतचा अहवाल मंगळवारी जिल्हा परिषदेने महापालिकेला सादर केला. यात संबंधित आठ गावांमधील केवळ मूलभूत सोयीसुविधांची माहिती देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ही माहिती दिली.आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांचा संदर्भ देऊन उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, बालिंगा मूळ गावठाण वगळून, पाडळी मूळ गावठाण वगळून या आठ गावांचा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये समावेश व्हावा, यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत कोल्हापूर महापालिकेला पत्र दिले होते. त्यानुसार या प्रक्रियेचा भाग म्हणून महापालिकेने जिल्हा परिषदेला पत्र देऊन या आठ गावांविषयीच्या माहितीचा अहवाल मागवला होता.

त्यानुसार कार्तिकेयन यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना याबाबतच्या माहिती संकलनाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्राथमिक माहिती संकलित करण्यात आली आणि अंतिम अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला.

काय आहे अहवालात..?या अहवालामध्ये गावांची लोकसंख्या, क्षेत्र, रस्त्यांचे क्षेत्र, प्रशासकीय इमारती, पाण्याची सुविधा, शहरापासूनचे अंतर, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना याची माहिती देण्यात आली आहे.

अहवाल तयार झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करून तो अंतिम करण्यात आला. जिल्हा परिषदेचे सभागृह सध्या अस्तित्वात नाही. त्या त्या गावांची हद्दवाढीबाबतची नेमकी भूमिका याबाबत जिल्हा परिषद कोणता निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे या गावांतील सर्व प्राथमिक माहितीचे संकलन करून तसा अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला आहे. - कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर