शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी हटाओ, संविधान बचाओ; कोल्हापुरात इंडिया आघाडीची निदर्शने 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 22, 2023 15:41 IST

सरकारकडून स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचे काम

कोल्हापूर : देशातील मुलभूत प्रश्नांवर वाचा फोडणाऱ्या १४६ खासदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीचा, स्वातंत्र्याचा गळा चेपण्याचे काम आहे. मोदी सरकारला विरोधक संपवून देशावर हुकुमशाही लादायची आहे.. पण आपण एकजुटीने, शाहूंच्या भूमितून वैचारीक लढा देऊया असा निर्धार करत शुक्रवारी इंडिया आघाडीच्यावतीने बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, संविधान जिंदाबाद, लोकशाहीची हत्या करणारा मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी, भाजप हटाओ देश बचाओ,, अशा घोषणांनी चौक दणाणून गेला.विरोधी पक्षातील १४६ खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील, जयंत आसगावकर, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, शिवसेनेचे विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, पद्मजा तिवले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अविनाश नारकर, शेतकरी कामगार पक्षाचे बाबुराव कदम, व्यंकाप्पा भोसले, शारंगधर देशमुख, ईश्वर परमार, सतिशचंद्र कांबळे, आपचे संदीप देसाई यांच्यासह सहभागी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सतेज पाटील म्हणाले, महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य दिले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आपण एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचे काम केले जात आहे. लोकशाहीच्या मंदिरात येऊन आंदोलन करण्याची वेळ तरुणांवर येते याचे आत्मपरीक्षण सरकारने करावे. संसदेत खासदारांना नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. हा प्रश्न फक्त निलंबनाचा नाही तर खासदारांचे निलंबन करून तीन कायदे मंजूर करायेच होते.विजय देवणे म्हणाले, हा लोकशाहीला हुकुमशाहीकडे नेण्याचा प्रकार आहे. इंडिया आघाडीची एवढी धास्ती घेतली की, सगळ्या विरोधी खासदारांना संसदेबाहेर घालवायला निघाले आहे. मत व्यक्त करणाऱ्यांचे निलंबन हा अजेंडा राबवला जात आहे. हा चोराच्या उलट्या बोंबा मारण्याचा प्रकार आहे.व्ही. बी. पाटील म्हणाले, खासदारांनी महत्वाच्या विषयावर करण्याची मागणी केली तर त्यांच्यासह काही अनुपस्थित खासदारांचेही निलंबन केले गेले. उदय नारकर म्हणाले, मोदी आणि भाजपने त्यांचा प्रचार करण्यासाठी शासकीय यंत्रणेला दावणीला बांधले आहे. मोदी सरकारने काढलेल्या संकल्प यात्रेला जनतेतून विरोध होत आहे. आपचे संदीप देसाई तसेच शिवाजीराव परुळेकर यांनीही मनोगत मांडले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagitationआंदोलन