शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अतिक्रमणे सरसकट काढा; सर्किट बेंचचे महापालिका, जिल्हा परिषदेला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:16 IST

अहवाल सादर न केल्याबद्दल नाराजी

कोल्हापूर : शहरातील अतिक्रमण काढताना काही ठराविक भागातीलच काढू नका, सरसकट संपूर्ण शहरातील काढा, ज्या ठिकाणचे अतिक्रमण काढले आहे त्या ठिकाणी पुन्हा ते होणार नाही, याची खबरदारी घ्या, तसेच यासंबंधीचा अहवाल दि. २६ फेब्रुवारीच्या सुनावणी वेळी सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती राजेंद्र अवचट व न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांनी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेला गुरुवारी दिले.कोल्हापूर शहर आणि परिसरातील खराब रस्ते, अतिक्रमण यासंबंधीची जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे दाखल झाली आहे. त्यावर गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू झाली आहे. गुरुवारीही त्यावर सुनावणी पार पडली.महापालिकेच्या निवडणूक नुकतीच झाली, या निवडणुकीत सगळी यंत्रणा व्यस्त राहिल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेची गती काहीशी कमी झाली होती; परंतु ती आता गतिमान केली जाईल, असे महापालिकेतर्फे वकील अभिजित आडगुळे यांनी सांगितले.तेव्हा ठराविक भागातीलच अतिक्रमण न काढता सरसकट संपूर्ण शहरातील काढावे. प्रक्रिया नियमित सुरू ठेवा. जेथे यापूर्वी कारवाई केली आहे, तेथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याचीही खबरदारी घ्या, असे निर्देश न्यायमूर्तींनी दिले.

अहवाल सादर न केल्याबद्दल नाराजीसुनावणीच्या प्रत्येक तारखेपूर्वी रस्त्यांच्या कामाच्या प्रगतीचे अहवाल संबंधित यंत्रणांनी देण्याचे आदेश आधीच दिलेले आहेत, त्याची पूर्तता त्यांनी केलेली नाही, याकडे लक्ष वेधत न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांनी नाराजी व्यक्त केली तेव्हा रस्त्यांची कामे चालू असली तरी न्यायाधीशांनी बोट ठेवलेल्या त्रुटींचे कारण सध्या चालू असलेल्या निवडणूक प्रक्रिया आहेत, असे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या वकिलांनी मांडले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: High Court Orders Complete Removal of Encroachments

Web Summary : The High Court directed Kolhapur Municipal Corporation and Zilla Parishad to remove all encroachments citywide and prevent their recurrence. A progress report is due February 26th. Roadwork progress reports were also mandated.