शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपण करून आठवण ठेवा

By admin | Updated: February 23, 2015 23:55 IST

पानसरे कुटुंबीयांचे आवाहन : राज्यातील कार्यकर्त्यांना देणार अस्थिकलश

कोल्हापूर : प्रत्येक कार्यकर्त्यांने अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या अस्थींचे वृक्षारोपांद्वारे शेतात वृक्षारोपण करून त्यांच्या आठवणी चिरंतन ठेवा, असे आवाहन पानसरे कुटुंबीय व कार्यकर्त्यांच्यावतीने सोमवारी केले. पंचगंगा स्मशानभूमीवर सकाळी पानसरे यांची मुलगी स्मिता सातपुते, मेघा पानसरे-बुट्टे, जावई बन्सी सातपुते, हेमंत बुट्टे यांनी पानसरे यांच्या अस्थी (रक्षा)चे दर्शन घेतले. त्यानंतर प्रत्येक वृक्षरोपामध्ये अस्थी टाकून ते प्रत्येक कार्यकर्त्याला दिले. गोविंद पानसरे यांची मरणोत्तर कोणताही विधी करू नये, अशी इच्छा होती. त्यानुसार त्यांच्या अस्थी वृक्षरोपामधून देण्यात आल्या.गेल्या सोमवारी (दि. १६) अ‍ॅड. पानसरे यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर मृत्यूशी झुंज देत असलेल्या पानसरे यांची प्राणज्योत मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात शुक्रवारी (दि. २०) मालवली. शनिवारी (दि. २१) त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत कोणत्याही विधीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले होते. सोमवारी अस्थिदर्शन घेतेवेळी स्मिता पानसरे म्हणाल्या, माझ्या वडिलांनी वाईट प्रथा, रुढी यांच्या विचारांना आयुष्यभर विरोध केला. त्याच विचारांचे अनुकरण म्हणून त्यांची रक्षा राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला देण्यात आली. यातून त्यांच्या आठवणी चिरंतन राहतील. भालचंद्र कांगो म्हणाले, या अस्थी पक्षाचे कार्यकर्ते घेऊन जातील. त्यांचे शेतामध्ये वृक्षारोपण करून त्यांचे विचार, आठवणी सदैव ते स्मरणात ठेवतील. त्यानंतर पानसरे यांच्या अस्थी दसरा चौक, शाहू स्मारक भवन येथे सुरू असलेल्या २२ व्या राज्य अधिवेशनात दर्शनासाठी नेण्यात आल्या. त्याठिकाणी राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला अस्थी देण्यात येणार आहेत. यावेळी दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, एम. बी. पडवळे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.