शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
3
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
4
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
5
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
6
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
7
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
8
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
9
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
10
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
11
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
12
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
13
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
14
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
15
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
16
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
17
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
18
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
19
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
20
भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ब्लॅकमेल कराल तर याद राखा

By admin | Updated: August 1, 2015 00:07 IST

राजू शेट्टी : रस्त्यावरील लढाई करण्यास सज्ज; उदगाव येथे शेतकरी मेळावा

जयसिंगपूर : ऊस जादा आहे, साखरेला दर नाही, त्यामुळे साखर कारखाने बंद ठेवू असे सांगून शेतकऱ्यांना ब्लॅकमेल कराल, तर याद राखा, असा सज्जड इशारा देत आगामी हंगामात ऊस दरासाठी रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी केले. उसाच्या यंदाच्या एफआरपीसह पुढील वर्षाचीही वाढीव एफआरपी कारखानदारांच्या मानगुटीवर बसून वसूल करणार असल्याचेही यावेळी खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फरीद नदाफ होते. खा. शेट्टी म्हणाले, कारखाने बंद ठेवणार असल्याची आवई साखर कारखानदार आतापासूनच उठवत आहे. साखर कारखाने हे शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. त्यांनी जर कारखाने चालू केले नाहीत, तर साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्यास भाग पाडू. शेतकरीही ऊस घालवण्यास तयार आहे. सध्या साखरेचे दर बाजारात कोसळले आहेत. जवळपास १ कोटी ६० लाख टन साखर शिल्लक आहे. देशाची गरज २४० लाख टन आहे. तरीही येणाऱ्या हंगामात २६० लाख टन साखर उत्पादित होणार आहे. १ कोटी टन साखर शिल्लक राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने त्वरित साखरेचा ६० लाख टनाचा बफर स्टॉक करावा व उर्वरित साखर निर्यात केल्यास शिल्लक साखरेचा प्रश्न मिटणार आहे. ते हणाले, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगले यश मिळाले आहे. गावातील विकासाच्या धोरणात सदस्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्यास गावचा विकास होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.यावेळी स्वाभिमानी तसेच आघाडीमधून निवडून आलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील, भगवान काटे, राजेंद्र गड्यान्नावर, अण्णासो चौगुले, जि. प.चे बांधकाम सभापती सीमा पाटील, पं. स.चे सभापती शीला पाटील, उपसभापती वसंत हजारे, जि. प.चे सदस्य सावकर मादनाईक, जि. प.चे सदस्य सुरेश कांबळे, तालुकाध्यक्ष आदिनाथ हेमगिरे यांच्यासह सर्व पदाधिकारी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) एफआरपी बदलल्यास गंभीर परिणामखा. शेट्टी म्हणाले, सन २०१५-१६ च्या गळीत हंगामासाठी एफआरपीमध्ये १०० रुपयाने वाढ झालेली आहे. त्यातच साखर कारखानदार साखरेच्या दराची भीती घालून एफआरपी बंद करा, अशी ओरड सुरू करत आहेत. एफआरपी बदलण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केला, तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.