शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

दहा दिवसांच्या उघडिपीनंतर सक्रीय झाल्याने पिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 11:54 IST

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली आहे. १0 दिवसांच्या उघडिपीनंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने खरीप पिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १३५.८५ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस ५२.५० मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला.

ठळक मुद्देदहा दिवसांच्या उघडिपीनंतर सक्रीय झाल्याने पिकांना दिलासादोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली आहे. १0 दिवसांच्या उघडिपीनंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने खरीप पिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १३५.८५ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस ५२.५० मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला.आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने काहीशी दडी मारली होती. गेले १0 दिवस खडखडीत ऊन पडल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. माळरानावरील भात, भुईमूग, नागली पिके ढगाकडे बघत होती; पण गुरुवारपासून वातावरणात बदल होत गेला आणि दुपारनंतर हलक्या सरी कोसळू लागल्या. गुरुवारी रात्रभर व शुक्रवारी सकाळी दहापर्यंत पावसाची रिपरिप कायम राहिली. सकाळी ११ नंतर पावसाने उघडीप दिली असली, तरी सायंकाळनंतर पुन्हा हलक्या सरी कोसळल्या.या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला असून, कडक ऊनानंतर आता पाऊस सुरू झाल्याने तो पिकांच्या वाढीस पोषक ठरला आहे. गेले दोन दिवस पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांत चांगला पाऊस झाला. इतर तालुक्यांत तुरळक पाऊस झाला असून, येत्या दोन दिवसांत पावसाचा हळूहळू जोर वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’ ईशान्य अरबी समुद्राच्या वर समुद्रसपाटीपासून ५.४ किलोमीटरपर्यंत आहे. त्याच्या प्रभावामुळे कोकण व गोव्यात मोठा पाऊस होईल. येत्या दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये-हातकणंगले-३, शिरोळ-१.१४, पन्हाळा-१९.८६, शाहूवाडी-३०.१७, राधानगरी-१०.१७, गगनबावडा-५२.५०, करवीर-३.६४, कागल-३.४३, गडहिंग्लज-निरंक, भुदरगड-२०.२०, आजरा-२.७५, चंदगड-३. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर