शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

आंबेओहोळ  प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करणारच - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 3:28 PM

Hasan Mushrif Dam Kolhapur- आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन हेच आपले ब्रीद असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ठळक मुद्देआंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करणारच - हसन मुश्रीफशेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन हेच आपले ब्रीद

कोल्हापूर : आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन हेच आपले ब्रीद असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.आंबेओहोळ प्रकल्पाच्या कामासाठी २० वर्षापेक्षा जादा काळ झालेला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अनेक बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण स्वतः केलेला आहे.

लाभक्षेत्रामध्ये जमिनी मिळण्यामध्ये अडचणी झाल्यानंतर प्रति हेक्‍टर ३६ लाख रुपये दराने २५८ हेक्‍टरसाठी एकूण ९३ कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज मंजूर झाले आहे. त्यापैकी १२९ हेक्‍टरसाठी २५८ जणांना ४६ कोटी ४४ लाख रुपये पॅकेजचे वाटप झाले आहे. तसेच १०६ हेक्टर जमिनीचे वाटप होऊन त्यामध्ये ९६ जणांना पूर्णत: जमीन वाटप व ३२ जणांना अंशत: जमीन वाटप झाल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.संकलन दुरुस्ती, कुटुंबाची व्याख्या, चार एकरांपेक्षा जादा जमिनी देण्याबाबत अडचणी व इतर सर्व प्रश्नांचा निपटारा येत्या १५ दिवसांमध्ये करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याबाबत १५ मार्च रोजी प्रश्ननिहाय बैठक घेणार आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

अगदी शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हे माझे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरDamधरण