शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रिपरिप, शहरात दिवसभर ढगाळ वातावरण

By admin | Updated: June 15, 2014 01:35 IST

पाऊस आला रे... : गगनबावडा तालुक्यात ६३ मि.मी. पावसाची नोंद

कोल्हापूर : आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज, शनिवारी सकाळपासून मान्सूनचे आगमन कोल्हापूर जिल्ह्यात झाले. ग्रामीण भागात दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती, तर शहरात ढगाळ वातावरण राहिले. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६३ मि.मी. झाला आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन आठ दिवस झाले तरी पाऊस सुरू होत नसल्याने सर्वच चिंतेत होते. काल, शुक्रवारी दुपारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुन्हा आज पहाटे दमदार पाऊस झाला. सकाळपासून ग्रामीण भागात पावसाची भुरभुर सुरू होती. नऊनंतर हळूहळू पावसाचा जोर वाढू लागला. शहरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला असून उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारवा मिळाला. मृग नक्षत्राचे वाहन ‘हत्ती’ असल्याने या कालावधीत पाऊस चांगला होईल, असा अंदाज होता, पण मृग निम्मा झाला तरी अजून ताकदीने पावसाची सुरुवात झालेली नाही. गेल्यावर्षी मृग नक्षत्रात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे अनेकांच्या खरीप पेरण्या होऊ शकल्या नव्हत्या. आजपासून कमी प्रमाणात का असेना, पण पावसाने सुरुवात केल्याने बळिराजाला दिलासा मिळालेला आहे. हा पाऊस खरीप पेरणीला पोषक आहे. धूळवाफ पेरणी झालेल्या भाताच्या उगवणीस उपयुक्त असा पाऊस झाला असून भुईमूग, खरीप ज्वारीच्या पेरणीला येत्या दोन दिवसांत वेग येणार आहे. (प्रतिनिधी)