Gokul Milk Election : : गोकुळचे रणांगण : महिला राखीव गटात रेडेकर आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 20:00 IST2021-05-04T12:37:04+5:302021-05-04T20:00:33+5:30
gokukl Result : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत विरोधी पालकमंत्री सतेज पाटील- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आघाडीचे महिला राखीव गटातील उमेदवार श्रीमती अंजना केदारी रेडेकर व सुश्मिता राजेश पाटील या आघाडीवर आहेत.

Gokul Milk Election : : गोकुळचे रणांगण : महिला राखीव गटात रेडेकर आघाडीवर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत विरोधी पालकमंत्री सतेज पाटील- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आघाडीचे महिला राखीव गटातील उमेदवार श्रीमती अंजना केदारी रेडेकर व सुश्मिता राजेश पाटील या आघाडीवर आहेत.
तिसऱ्या फेरीअखेर शौमिका महाडिक या १११ मतांनी मागे आहेत. अंजना रेडेकर यांना चांगले मताधिक्क्य मिळाले असून दुसऱ्या जागेसाठी विरोधी आघाडीच्या सुश्मिता पाटील व सत्तारुढ आघाडीच्या अनुराधा पाटील यांच्यात चुरस सुरु आहे.
तिसऱ्या फेरीतील मते अशी (कंसातील मते तिसऱ्या फेरीअखेरची)
- अंजना रेडेकर (विरोधी आघाडी) २५९ (७२२)
- सुश्मिता राजेश पाटील (विरोधी आघाडी) - २३० (७२२)
- शौमिका महाडिक (सत्तारुढ आघाडी) - २०१ (६११)
- अनुराधा पाटील सरुडकर (सत्तारुढ आघाडी) - १९१ (६०६)
तिसऱ्या फेरीअखेर विरोधी आघाडीच्या रेडेकर १११ तर सुश्मिता पाटील या ३९ मतांनी आघाडीवर आहेत.
या निवडणूकीत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ विरुध्द काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक अशी अत्यंत चुरशीने लढत झाली. दोन्ही आघाड्याकडून सत्ता आमचीच असा दावा मंगळवारी सकाळी मतमोजणीस सुरुवात होईपर्यंत केला जात होता. क्रॉस व्होटींग होणार असल्याने सत्तारूढ आघाडीला विजयाचा विश्वास होता. परंतू राखीव गटात मात्र विरोधी आघाडीने जोरदार मुंसडी मारल्याचे चित्र आहे.