ग्रंथपाल, क्रीडा संचालक भरती प्रक्रिया सुरू; कोल्हापुरात ६७ पदांमध्ये तफावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:43 IST2026-03-17T12:42:23+5:302026-03-17T12:43:07+5:30

कोणत्या महाविद्यालयाला किती जागा भरायच्या याचा फॉर्म्युला दोन दिवसांत जाहीर होणार

Recruitment process for Librarian, Sports Director begins; Gap in 67 posts in Kolhapur | ग्रंथपाल, क्रीडा संचालक भरती प्रक्रिया सुरू; कोल्हापुरात ६७ पदांमध्ये तफावत

संग्रहित छाया

कोल्हापूर : उच्च शिक्षण संचालनालयाने अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या भरतीसंदर्भात विभागीय सहसंचालकांना अद्ययावत माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. २०१७ नंतरच्या पदभरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असला, तरी आधी सादर केलेल्या आकडेवारीत ६७ पदांमध्ये तफावत आढळून आल्याने शासनाने अचूक माहिती मागवली आहे.

संचालनालयाने १ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या स्थितीनुसार शिक्षक व शिक्षकेतर पदांचा आढावा शासनाला सादर केला होता. त्यानुसार ३ नोव्हेंबर २०१८ रोजी शिक्षकीय पदभरतीस मान्यता दिली. मात्र, सप्टेंबर २०२५ मध्ये विभागीय सहसंचालक कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या नव्या आकडेवारीत पूर्वीच्या आकडेवारीशी विसंगती आढळल्याने ही प्रक्रिया पुन्हा तपासली जात आहे. यामुळे संचालनालयाने सर्व विभागीय सहसंचालकांना महाविद्यालयनिहाय माहिती अद्ययावत करून पुन्हा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

यात १ ऑक्टोबर २०१७ रोजीची स्थिती, त्यानंतर भरलेली पदे तसेच त्या नंतर रिक्त झालेल्या पदांचा तपशील देण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार १ ऑक्टोबर २०२५ च्या विद्यार्थीसंख्येच्या आधारे कार्यभारानुसार ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक या रिक्त पदांची माहितीही १६ मार्च २०२६ पर्यंत स्वतंत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रक्रियेनंतर प्रलंबित पदभरतीला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अशी आहे तफावत

कोल्हापूर विभागातील आकडेवारीनुसार ग्रंथपाल संवर्गात १३३ पदांपैकी ९६ पदे भरलेली असून, ३७ पदे रिक्त असल्याचे पूर्वीच्या आढाव्यात नमूद होते. तर सप्टेंबर २०२५ मधील माहितीनुसार ९९ पदे भरलेली असून ३४ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शारीरिक शिक्षण संचालक पदांसाठी १२२ पदांपैकी ८७ पदे भरलेली व ३५ रिक्त असल्याची आकडेवारी आधी दिली होती. नव्या अहवालानुसार १२१ अनुज्ञेय पदांपैकी ८८ भरलेली व ३३ पदे रिक्त असल्याचे नमूद केले आहे.

पदवाटपाचा फॉर्म्युला 

सर्व विभागीय सहसंचालकांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील २०१७ नंतरच्या प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या पदभरतीस मान्यता दिली आहे. कोणत्या महाविद्यालयाला किती जागा भरायच्या याचा फॉर्म्युला दोन दिवसांत जाहीर होणार आहे. यात राज्यातील ११५४ आणि कोल्हापुरातील १३३ महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक वर्षे कायम नोकरीपासून वंचित असलेल्या सीएचबीवरील प्राध्यापकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title : पुस्तकालयाध्यक्ष, क्रीड़ा निदेशक भर्ती शुरू; कोल्हापुर में 67 पदों का अंतर

Web Summary : कोल्हापुर कॉलेजों में पुस्तकालयाध्यक्ष, क्रीड़ा निदेशक भर्ती में देरी। 2017 के बाद डेटा विसंगतियां मिलीं, पुनर्मूल्यांकन हुआ। अपडेटेड जानकारी मांगी; पद आवंटन का फॉर्मूला जल्द जारी होगा, जिससे कई लोगों को स्थायी पदों का इंतजार है।

Web Title : Librarian, Sports Director Recruitment Starts; Discrepancy of 67 Posts in Kolhapur

Web Summary : Kolhapur colleges' librarian, sports director recruitment faces delay. Data discrepancies found post-2017, prompting re-evaluation. Updated info sought; formula for post allocation soon to be released, bringing relief to many awaiting permanent positions.