शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातून २६५० अग्निवीरांची विक्रमी भरती, प्रशिक्षणासाठी झाले रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:03 IST

महाराष्ट्रातील एका एकमेव आर्मी रिक्रुटिंग ऑफिसमधून झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक भरती

कोल्हापूर : महाराष्ट्रातील आर्मी रिक्रुटिंग ऑफिस, कोल्हापूर यांनी सुमारे २६५० अग्निवीरांची भरती करून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्रातील एका एकमेव आर्मी रिक्रुटिंग ऑफिसमधून झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक भरती आहे.ही उल्लेखनीय कामगिरी कर्नल प्रशांत सिंग, डायरेक्टर रिक्रुटिंग आणि लेफ्टनंट कर्नल संबित पात्रा, रिक्रुटिंग मेडिकल ऑफिसर, एआरओ कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली तसेच मेजर जनरल एस. पी. विश्वासराव, अतिरिक्त महासंचालक (भरती), मुख्यालय रिक्रुटिंग झोन, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य झाली.ही भरती प्रक्रिया कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच गोव्यातील दोन जिल्हे, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा येथील उमेदवारांसाठी राबविण्यात आली. या प्रक्रियेचा उद्देश परिसरातील सर्वोत्तम युवकांची निवड करून त्यांना ‘अग्निवीर’ म्हणून देशसेवेची संधी उपलब्ध करून देणे हा होता.निवड झालेल्या अग्निवीरांना विशेष बसद्वारे त्यांच्या संबंधित रेजिमेंटल केंद्रांकडे रवाना करण्यात आले. भरती निकाल १३ जानेवारी रोजी जाहीर झाला होता आणि १८ जानेवारी रोजी पहिल्या तुकडीला प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले. हे सर्व आर्मी रिक्रुटिंग ऑफिस, कोल्हापूर, १०९ इन्फंट्री बटालियन (टीए), मुख्यालय रिक्रुटिंग झोन, पुणे, तसेच नागरी प्रशासन आणि पोलिस विभाग यांच्या उत्कृष्ट समन्वयाने व अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले.

आमच्या मुलाची निवड झाल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान आहे. देशसेवा करण्याची त्याची नेहमीच इच्छा होती आणि तो नक्कीच आम्हांला अभिमान वाटावा असे कार्य करील. - पालक

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Achieves Record-Breaking Recruitment of 2650 Agniveers for Training

Web Summary : Kolhapur's Army Recruiting Office achieved a record by recruiting 2650 Agniveers. This significant recruitment involved candidates from Kolhapur, Sangli, Satara, Sindhudurg, Ratnagiri, and Goa. Selected candidates have been dispatched to regimental centers for training after the results were announced on January 13th.