शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

सवलतीमुळे विक्रमी २१ कोटींचा घरफाळा जमा, अंतिम दिवशी २ कोटी २२ लाख जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 10:45 AM

सहा टक्के सवलत योजनेमुळे विक्रमी २१ कोटी ३ लाखांचा घरफाळा जमा झाला आहे. योजनेच्या मंगळवारी अंतिम दिवशी सायंकाळी उशीरापर्यंत नागरी सुविधा केंद्रासमोर घरफाळा जमा करण्यासाठी मिळकतधारकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात तब्बल २ कोटी २२ लाख घरफाळा जमा झाले.

ठळक मुद्दे सवलतीमुळे विक्रमी २१ कोटींचा घरफाळा जमा, अंतिम दिवशी २ कोटी २२ लाख जमा नागरी केंद्रासमोर उशीरापर्यंत रांगा : आजपासून चार टक्के सवलत

कोल्हापूर : सहा टक्के सवलत योजनेमुळे विक्रमी २१ कोटी ३ लाखांचा घरफाळा जमा झाला आहे. योजनेच्या मंगळवारी अंतिम दिवशी सायंकाळी उशीरापर्यंत नागरी सुविधा केंद्रासमोर घरफाळा जमा करण्यासाठी मिळकतधारकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात तब्बल २ कोटी २२ लाख घरफाळा जमा झाले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा टक्के सवलत योजनेचा लाभ मिळकतधारकांनी घ्यावा यासाठी घरफाळयाची बिले महानगरपालिका संकेतस्थळावर ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली होती. याजनेचा अंतिम दिवस असल्याने मंगळवारी नागरी सुविधा केंद्राची कामकाज वेळही वाढवली होती. येथे १ कोटी ९३ लाख तर ऑनलाईनद्वारे २९ लाख २२ हजार रुपये घरफाळा जमा झाला.

घरफाळा बीलात सहा टक्के सवलत योजनाला चांगला प्रतिसाद मिळाला. गतवर्षाची तुलनेत दुप्पट घरफाळा वसुल झाला आहे. या योजनेची ३० जून ही अंतीम तारीख होती. आज, बुधवारपासून ४ टक्के सवलत योजनेला सुरवात झाली आहे. ज्यांना सहा टक्के सवलत योजनेचा लाभ घेता आला नाही त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.- संजय भोसले, कर संग्राहक व निर्धारक

४५ हजार ९३२ मिळकतधारकांना लाभमहापालिकेच्या तिजोरीत सवलत योजनेमुळे २१ कोटींची कमाई झाली. तर ४५ हजार ९३२ मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला. यामध्ये नागरी सुविधा केंद्रात ३४ हजार ६५ तर ऑनलाईनद्वारे ११ हजार ८६७ इतक्या मिळकतधारकांनी कर भरला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर