शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अरुण लाड यांच्यासमोर बंडखोर उमेदवारांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 10:54 IST

pune, elecation, kolhapurnews, politics गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासमोर त्यांच्या पक्षातील बंडखोरांबरोबरच भाजपच्या उमेदवाराचे आव्हान राहणार आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विरोधात डॉ. श्रीमंत कोकाटे आणि नीता ढमाले या अपक्षांसह भाजपचे संग्रामसिंह देशमुख निवडणूक लढवित आहेत. कोल्हापुरातील सहा अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

ठळक मुद्देअरुण लाड यांच्यासमोर बंडखोर उमेदवारांचे आव्हान कोल्हापुरातील सहा अपक्ष उमेदवार रिंगणात : पुणे पदवीधर निवडणूक

कोल्हापूर : गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासमोर त्यांच्या पक्षातील बंडखोरांबरोबरच भाजपच्या उमेदवाराचे आव्हान राहणार आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विरोधात डॉ. श्रीमंत कोकाटे आणि नीता ढमाले या अपक्षांसह भाजपचे संग्रामसिंह देशमुख निवडणूक लढवित आहेत. कोल्हापुरातील सहा अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील यांच्या विरोधात अरुण लाड यांनी बंडखोरी केली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यातील लाड यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या डॉ. कोकाटे आणि ढमाले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तर कोल्हापुरातील जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून माघार घेतली. त्यामुळे लाड यांच्यासमोर आता या बंडखोर उमेदवारांसह भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचे आव्हान आहे.

कोल्हापुरातील अमर माने (उजळाईवाडी), गोवर्धन राजेशिर्के (मोरेवाडी), बळवंत पोवार (पुनाळ), मानसिंग जगताप (राजारामपुरी), सुनील संकपाळ (शेडशाळ), संजय मागाडे (राजेंद्रनगर) हे अपक्ष उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.एकूण ६२ उमेदवार रिंगणातया मतदारसंघामध्ये ६२ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. त्यात बाराजण पक्षाकडून, तर ५० उमेदवार अपक्ष म्हणून लढणार आहेत.आकडेवारी दृष्टिक्षेपातजिल्हा   मतदार       मतदान  केंद्र     

  • पुणे            ८५६१९          २३२
  • सातारा       ५६१२६          १३२
  • सांगली       ८६७३६         १४३
  • सोलापूर       ४८९१९       १२३
  • कोल्हापूर      ८७९५८      २०५

एकूण            ३६५३५८        ८३५

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारणPuneपुणेkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरSangliसांगलीSolapurसोलापूर