कोल्हापुरात लागला दुर्मीळ पांढऱ्या खारूताईंचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:02 IST2026-03-31T18:02:03+5:302026-03-31T18:02:29+5:30

संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली

Rare white kharutai discovered in Kolhapur | कोल्हापुरात लागला दुर्मीळ पांढऱ्या खारूताईंचा शोध

कोल्हापुरात लागला दुर्मीळ पांढऱ्या खारूताईंचा शोध

कोल्हापूर : शहरातील मानवी वस्तीजवळ आढळलेल्या पांढऱ्या रंगाच्या दुर्मीळ खारूताईंच्या निरीक्षणामुळे वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले असून, या घटनेवर आधारित संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

पक्षीनिरीक्षण करत असताना मयुरेश रामपुरे आणि देवेंद्र भोसले यांना १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची खारूताई आढळली. सुरुवातीला एकच खारूताई असल्याचा समज होता; मात्र पुढील निरीक्षणात अशा दोन खारूताई असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार दुर्मीळ असल्याने त्याचा सखोल अभ्यास सुरू करण्यात आला.

तपासणीत या खारूताई ल्यूसीस्टिक प्रकारातील असल्याचे निष्पन्न झाले. ल्यूसीझम हा अनुवंशिक विकार असून, त्यामध्ये शरीरातील रंगद्रव्य कमी होते, मात्र डोळ्यांचा रंग सामान्य राहतो. विशेष म्हणजे या खारूताईंच्या अंगावरील पारंपरिक तपकिरी रंगाऐवजी फिकट पांढरा-करडा रंग दिसून आला आणि पाठीवरील तीन पट्ट्यांचा अभाव आढळला.

या घटनेवर आधारित संशोधन निबंध कल्पना साबळे यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला. हा निबंध ‘मेडिसिया’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून, त्याला वैज्ञानिक मान्यता मिळाली आहे. संशोधनात कोल्हापूर शहरातील मानवी प्रभाव असलेल्या परिसरात दोन ल्यूसीस्टिक थ्री-स्ट्राइप्ड पाम स्क्विरल आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याबाबत देवेंद्र भोसले यांनी सांगितले की, “अशा रंगातील बदल असलेल्या प्राण्यांना नैसर्गिक वातावरणात जगणे आव्हानात्मक असते. तरीही अशा घटनांची नोंद करणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यातून जैवविविधता आणि पर्यावरणीय बदलांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते.

कोल्हापूरसारख्या मानवी प्रभाव असलेल्या भागात ल्यूसीस्टिक खारुताईंचे निरीक्षण करून त्याचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण करणे ही उल्लेखनीय बाब आहे. या संशोधनामुळे महाराष्ट्रातील जैवविविधतेच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल. -ओंकार यादव, अभ्यासक.

Web Title : कोल्हापुर में दुर्लभ सफेद गिलहरी की खोज, अनुसंधान में रुचि

Web Summary : कोल्हापुर के शोधकर्ताओं ने मानव बस्तियों के पास दुर्लभ ल्यूसिस्टिक गिलहरियों की खोज की। आनुवंशिक असामान्यता के कारण रंग हल्का, सामान्य धारियों की कमी। अंतरराष्ट्रीय स्तर पर प्रकाशित अनुसंधान जैव विविधता, पर्यावरणीय परिवर्तनों पर प्रकाश डालता है; संरक्षण प्रयासों के लिए महत्वपूर्ण।

Web Title : Rare White Squirrel Discovery in Kolhapur Sparks Research Interest

Web Summary : Kolhapur researchers discovered rare leucistic squirrels near human settlements. Genetic anomaly causes pale coloration, lacking usual stripes. Research published internationally highlights biodiversity, environmental changes; important for conservation efforts.