रमाबाई आंबेडकर सूतगिरणीवर नेमला प्रशासक; वस्त्रोद्योग आयुक्तांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 19:09 IST2020-09-03T19:06:59+5:302020-09-03T19:09:26+5:30
हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीवर प्रशासक नियुक्ती झाली आहे. वस्त्रोद्योग आयुक्त व अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था डॉ. माधवी खोडे यांनी ही कारवाई १ सप्टेंबरला केली आहे.

रमाबाई आंबेडकर सूतगिरणीवर नेमला प्रशासक; वस्त्रोद्योग आयुक्तांची कारवाई
ठळक मुद्दे रमाबाई आंबेडकर सूतगिरणीवर नेमला प्रशासक; वस्त्रोद्योग आयुक्तांची कारवाईभ्रष्टाचार, शासनाची फसवणूक केल्याचा ठपका
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीवर प्रशासक नियुक्ती झाली आहे. वस्त्रोद्योग आयुक्त व अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था डॉ. माधवी खोडे यांनी ही कारवाई १ सप्टेंबरला केली आहे.
भ्रष्टाचार, कामातील अनियमितता आणि शासनाची फसवणूक हे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. विद्यमान संचालक मंडळाला नोटीस लागू केली असून, येत्या १८ सप्टेंबरपर्यंत त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार राजू आवळे व सत्यशोधन समितीचे अध्यक्ष प्रशांत चांदणे यांनी कारवाईबाबत पाठपुरावा केला होता.