शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल; एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 20:08 IST2022-06-23T20:07:47+5:302022-06-23T20:08:40+5:30

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे दैवत असून एकनाथ शिंदे हे गुरू असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

rajesh kshirsagar chairman planning board not reachable and claims that to support eknath shinde | शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल; एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा!

शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल; एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा!

कोल्हापूर : नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष व शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षिरसागर गुरुवारी दुपारपासून नॉट रिचेबल आहेत..त्यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

क्षिरसागर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची दुपारी निवासस्थानी बैठक घेतली. त्यात त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे दैवत असून एकनाथ शिंदे हे गुरू असल्याचे सांगितले. सध्या राज्यात निर्माण झालेली परिस्थिती चक्रव्यूहासारखी असून तो भेदण्यासाठी कांही निर्णय घेणे अनिवार्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले व दुपारीच ते गुवाहाटीकडे रवाना झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेने उद्या शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठींब्यासाठी वचनबद्ध फेरी काढण्याचे नियोजन केले असताना त्यांनी ही भूमिका घेतली आहे.
 

Web Title: rajesh kshirsagar chairman planning board not reachable and claims that to support eknath shinde