शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

राजाराम कारखाना निवडणूक: दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची सतेज यांना सवयच - अमल महाडिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 12:00 IST

स्वतःच्या डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे पाच हजार सभासद एका रात्रीत कमी करून बावीसशे करून ठेवले

कसबा बावडा : राजाराम कारखान्याच्या कारभाराबाबत लोकांच्या मनामध्ये वेळेनुसार दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचे काम आमदार सतेज पाटील करत आहेत. नेहमीच दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी काहीतरी वेगळं करतोय असे सांगायची त्यांची पद्धत आहे. एकीकडे सहवीज प्रकल्पाबाबत काहींनी विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र प्रकल्प का पूर्ण झाला नाही, असा प्रश्न विचारायचा, अशी दुटप्पी भूमिका ते घेत आहेत, असा आरोप माजी आमदार अमल महाडिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, चेअरमन दिलीप पाटील उपस्थित होते. अमल महाडिक म्हणाले राजाराम कारखान्यावर नेहमी दर कमी दिल्याचा आरोप केला जातो; पण कारखान्याचा प्लांट जुना आहे. १२२ गावे आणि साडेसात तालुक्यांत कार्यक्षेत्र विस्तारले आहे. कार्यक्षेत्रातील काही गावे पूरबाधित आहेत. कारखान्याच्या सभोवती २०० मीटर अंतरावर नदी आहे. पूर आल्याने त्याचा परिणाम उसावर होतो, तसेच गाळपासाठी आडसाली ऊस न येता खोडवे निडवेसुद्धा गाळपासाठी घेतले जातात. कारखान्याचे कोणतेही बाय प्रॉडक्ट नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून आमचा दर कमी दिसत असल्याचे महाडिक यांनी सांगितले. कारखान्याने एकूण अकराशेपेक्षा जास्त मयत सभासदांचे २०१४ ते २०१९ या कालावधीत शेअर ट्रान्सफर केले असल्याचे त्यांनी स्पष्ट करतानाच डी. वाय. पाटील कारखान्याने किती मयत सभासद शेअर ट्रान्स्फर झाले.? डी.वाय. पाटील कारखान्याच्या सभासदांपैकी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील किती, टनेजला साखर किती देता, शेअर्सला साखर किती देता, आपल्या व आमच्या दरातील फरक किती सांगा, असा उलटा सवालही अमल महाडिक यांनी केला.शक्तिप्रदर्शनात सभासद की कार्यकर्तेकारखान्यात भ्रष्टाचाराची एक तरी घटना आमच्या कारखान्यात दाखवावी, असे आव्हानही महाडिक यांनी दिले. लवकरच आम्ही पाच हजार गाळप क्षमता व अठरा मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्प निर्माण करून कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे सांगत अमल महाडिक म्हणाले सहाशे सभासदांच्या ताब्यात कारखाना जाऊ नये असे ते म्हणतात तर मग अठराशे सभासदांवर आक्षेप का घेतला. त्यांच्या स्वतःच्या डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे पाच हजार सभासद एका रात्रीत कमी करून बावीसशे करून ठेवले. सोमवारी त्यांनी शक्तिप्रदर्शन केले; पण त्यामध्ये सभासद किती आणि कार्यकर्ते किती याचेही अवलोकन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकAmal Mahadikअमल महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील