जेष्ठ साहित्यिक राजन गवस यांना पितृशोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 13:36 IST2019-02-14T13:15:48+5:302019-02-14T13:36:47+5:30
करंबळी (ता.गडहिंग्लज) येथील गणपती सखाराम गवस (९६) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (१४ फेब्रुवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले.

जेष्ठ साहित्यिक राजन गवस यांना पितृशोक
गडहिंग्लज - करंबळी (ता.गडहिंग्लज) येथील गणपती सखाराम गवस (९६) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (१४ फेब्रुवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे-परतवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन उद्या शुक्रवारी (१५) रोजी सकाळी नऊ वाजता आहे.
जेष्ठ साहित्यिक व शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. राजन गवस, सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. शाहू गवस, इंजिनिअर निवृत्ती गवस आणि प्रयोगशील शेतकरी उत्तम गवस यांचे ते वडील. सकाळी साडेदहा वाजता गवसवाडी येथील गवस मळयात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.