Neelam Gorhe: राज ठाकरे यांचा राजकीय गेम होईल-डॉ. नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:15 AM2022-05-11T11:15:24+5:302022-05-11T11:18:08+5:30

त्यावेळी त्यांना शिवसेनेशिवाय कोणीही दिसणार नाही, शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा राज ठाकरेंना उपरोधिक टोला.

Raj Thackeray political game will be says Dr. Neelam Gorhe | Neelam Gorhe: राज ठाकरे यांचा राजकीय गेम होईल-डॉ. नीलम गोऱ्हे

Neelam Gorhe: राज ठाकरे यांचा राजकीय गेम होईल-डॉ. नीलम गोऱ्हे

googlenewsNext

कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्ष वाचविण्यासाठी धडपडत आहेत. ध्वज बदलून पाहिला. भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. सीमाप्रश्नी वेगळी भूमिका मांडली. आता पुन्हा हिंदुत्वाकडे वळले आहेत. फायदा घेऊन त्यांचा राजकीय गेम होईल, त्यावेळी त्यांना शिवसेनेशिवाय कोणीही दिसणार नाही, असा उपरोधिक टोला शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी लगावला. डॉ. गोऱ्हे कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, राज्यात भाजपकडून केवळ विरोधाला विरोध असे राजकारण केले जात आहे. केवळ उपद्रव द्यायचा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. देवेंद्र फडणवीस भाजपमधीलच विनोद तावडे, पंकजा मुंडे यांचा विश्वास संपादन करू शकलेले नाहीत. त्यांना राज्याबाहेर जाण्याची वेळ आणली आहे. ते इतरांचा काय विश्वास संपादन करणार? मुख्यमंत्री ठाकरे चांगले काम करत असतानाही नाहक आरोप केले जात आहेत. यामुळेच १४ मे रोजी मुंबईत होणाऱ्या शिवसेना मेळाव्यात उपद्रवी वृत्तीला चोख उत्तर मिळेल.

चांगल्या हेतूने ‘लीलावती’ला जाब विचारला

खासदार नवनीत राणा यांचा लीलावती हॉस्पिटलमध्ये एमआरआय करताना फोटो व्हायरल झाला. एका महिलेची एमआरआय तपासणी करताना झाेपलेल्या अवस्थेतील फोटो घेणे चुकीचे आहे. अशा चांगल्या हेतूने शिवसेनेने लीलावती हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास जाब विचारला, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

विरोधकांना कोल्हापुरातील धडा सगळीकडे मिळेल

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीत झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या महिला उमेदवारास निवडून देत जनतेने विरोधकांना धडा शिकवला. कोल्हापुरात घडते ते सगळीकडे होते. असाच धडा इतर ठिकाणीही विरोधकांना मिळेल.

Web Title: Raj Thackeray political game will be says Dr. Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.