शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी अन् नदीत उडी

By admin | Updated: July 10, 2015 21:45 IST

महसूल यंत्रणा निवडणूक कामात : पाऊस नसल्याने शिरोळ तालुक्यामध्ये वाळू उपशाला पुन्हा जोर

संदीप बावचे- शिरोळ -‘वाळूचे आगर’ समजल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात एकीकडे नदीत कमी झालेले पाणी, त्यातच पावसाने मारलेली दडी पाहून वाळू उपसाधारकांनी पुन्हा नदीत उडी घेतली आहे. एरवी पाऊस किंवा पुरामुळे बंद होणारा वाळू उपसा यंदा मात्र पाऊस नसल्यामुळे पुन्हा सुरू झाला आहे. यामुळे वाळू उपसाधारकांची कोट्यवधीची चांदीच चांदी झाली आहे.शिरोळ तालुक्याला कृष्णा नदीचे विशाल पात्र लाभले आहे. पावसाळा संपला व नदीचे पाणी कमी झाले की, येथे वाळू उपसाधारकांची परवाना घेऊन वाळूचे डेपो मारण्याची लगबग उडते. सप्टेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत परवाना मिळाला आहे. यामुळे पावसाच्या कृपेवर व उपलब्ध मजुरांचा ताळमेळ घालून वाळू उपसा केला जातो. यावर्षी मात्र वरुणराजा शेतकऱ्यांवर रूसला आहे, तर वाळू उपसाधारकांवर चांगलाच फिदा झाला आहे. जून महिन्यात सुरुवातीला पावसाने जोरदार आगमन केले. मात्र, जुलै महिन्यात पावसाने दडी मारली आहे. पाऊस न पडल्याने व नदीची पाणीपातळी कमी झाल्याने उपसा करून मोठ्या प्रमाणात वाळूचे ढीग दिसू लागले आहेत. तालुक्यात नदीपलीकडील गावांमध्ये अनेक ठिकाणी सध्या जोरात वाळू उपसा सुरू आहे. एक वाळू उपसाधारक दिवसाला लाखो रुपयांची वाळू उपसा करतो. याचा हिशेब केल्यास कोट्यवधी रुपयांच्या घरात हा हिशेब जातो. एरवी शिरोळ आणि त्या ठिकाणी असणारा बेकायदा वाळू उपसा हा नेहमीच चर्चेचा व वादाचा विषय ठरला असताना पावसाने दडी मारलेली पाहून ठेकेदारांनी नदीत उडी घेऊन कोट्यवधी रुपयांचे वाळूचे डेपो अशाच पद्धतीने मारले आहेत. सध्या उदगांव, चिंचवाड, घालवाड, औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, गणेशवाडी, आलास, राजापूर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. ३१ सप्टेंबरपर्यंत वाळू उपसा करण्याची अंतिम मुदत असल्याने वाळूचा उपसा करून तिचे डेपो मारण्यात उपसाधारक मग्न असल्याचे चित्र आहे. एकीकडे वायुवेगाने वाढणारी सिमेंटच्या इमारतींची जंगले, तर दुसरीकडे वाढलेल्या वाळूच्या किमती या बाबी वाळूचा साठा करून व टंचाई करून वाळू उपसाधारकांचे उखळ पांढरे करणार यात तीळमात्र शंका नाही.अधिकारी कामात, वाळू तस्करी जोमातशिरोळ तालुक्यात बेसुमार वाळू उपसा सुरू झाला आहे. काही ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. सध्या महसूल यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात गुंतली आहे. नेमका याचा फायदा घेऊन वाळू तस्करीला जोर आला आहे. स्थानिक तलाठी व मंडल अधिकारी निवडणूक कामातून याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.