शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस, मान्सून ५ जूनपर्यंत सक्रिय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:47 IST

खरिपपूर्व शेतमशागतीची कामे पूर्णत: खोळंबली

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाची रोज हजेरी असून आगामी तीन-चार दिवस असेच वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.गेली पाच-सहा दिवस जिल्ह्यात कोठे ना कोठे जोरदार पाऊस कोसळला. रविवारी पहाटेपासूनच आकाश गच्च झाले आणि हलक्या सरी सुरू झाल्या. सकाळी नऊपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर ऊन पडले आणि उष्मा जाणवू लागला. दिवसभर वातावरणात उष्मा होता, सायंकाळी पाचनंतर आकाश गच्च झाले. मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहरात पंधरा ते वीस मिनिटे एकसारखा पाऊस झाला. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा गारवा मिळाला असला, तरी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना कसरत करावी लागली.

मान्सून ५ जूनपर्यंत कोल्हापुरातमान्सूनला पूरक असेच सध्या वातावरण आहे. यंदा मान्सून लवकर सक्रिय होणार हे अगोदरच सांगितले आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषता कोल्हापुरात ५ ते ६ जून रोजी मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती हवामान साक्षरता अभियानाचे मुख्य प्रबंधक राहुल पाटील यांनी दिली.

गडहिंग्लज तालुक्याला वळवाने तासभर झोडपले, वीटभट्टी व्यावसायिक अडचणीतगडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्याला वळीव पावसाने रविवारी सायंकाळी तासभर झोडपून काढले. त्यामुळे शहरासह शेतशिवारात पाणीच पाणी पाहायला मिळाले. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे आठवडी बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांसह नागरिकांची भंबेरी उंडाली. वारंवार पडणाऱ्या वळवामुळे खरिपपूर्व शेतमशागतीची कामे पूर्णत: खोळंबली आहेत. मान्सूनच्या तोंडावरही वळवाने पाठ न सोडल्याने शेतमशागतीची कामे कशी करायची, या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे.मार्च ते मे या ऐन घरे बांधणीच्या हंगामातच वळवाने सतत तडाखा दिल्यामुळे यंदा तालुक्यातील वीटभट्टी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, वळवामुळे शेतकऱ्यांचे हुकमी पीक उसाला मोठी ताकद मिळाली असून अनेक भागांत मोठ्या डौलाने ऊस पिके तरारून आली आहेत. हुमणी कीड मरण्यास पाऊस उपयुक्त ठरत आहे.चिकोत्रा खोऱ्याला झोडपून काढलेपांगिरे : चिकोत्रा खोऱ्यात गेल्या दोन दिवसांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, वादळी वाऱ्यासह पावसाने सायंकाळी चिकोत्रा खोऱ्याला झोडपून काढले. रोहिणी जवळ आल्यामुळे येथील शेतकरी भात शेती तयार करण्यात सुरुवात केली आहे. काही वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पावसाचे गेले तीन दिवस वातावरण होते. चिकोत्रा खोऱ्यातील पांगिरे, पिंपळगाव, बारवे, मुरुक्टे, मानवळे, बामणे, नागणवाडी, हेळेवाडी, दिंडेवाडी, आदी गावांना पावसाने झोडपून काढले. मात्र, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे शेतीची कामे खोळंबळी आहेत. येथील शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरीfarmingशेती