शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

प्लास्टिक विक्री करणाऱ्या सहा व्यावसायिकांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:24 PM

कोल्हापूर शहरात प्लास्टिकबंदी करण्यात आल्यानंतरही व्यापारी, विक्रेते प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाकडून होणाऱ्या कारवाईत सातत्य नसल्यामुळे पूर्णत: प्लास्टिकबंदी झालेली नाही, हे मंगळवारी झालेल्या कारवाईतून स्पष्ट झाले.

ठळक मुद्देप्लास्टिक विक्री करणाऱ्या सहा व्यावसायिकांवर छापे पथकाकडून कारवाईत सातत्य नसल्याचे स्पष्ट

कोल्हापूर : शहरात प्लास्टिकबंदी करण्यात आल्यानंतरही व्यापारी, विक्रेते प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाकडून होणाऱ्या कारवाईत सातत्य नसल्यामुळे पूर्णत: प्लास्टिकबंदी झालेली नाही, हे मंगळवारी झालेल्या कारवाईतून स्पष्ट झाले.आरोग्य विभागामार्फत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांवर मंगळवारी आरोग्य विभागाने छापे टाकून त्यांच्याकडून होणारी प्लास्टिक विक्री बंद पाडली. रंकाळा रोड, शाहूपुरी व पंचशील हॉटेल परिसरांत ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये इन्टाईस गेम झोन, राजेंद्र कोळी, हॉटेल कैलरू, शक्ती फ्लॉवर्स, तुलीप फ्लॉवर्स व अवंती वडा सेंटर यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून प्लास्टिकविरोधी पथकाने प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे तीस हजार रुपये दंड वसूल केला.केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक व थर्माकोल, इत्यादींपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, किरकोळ विक्री तसेच उत्पादन करणारे नागरिक व व्यावसायिक यांच्यावर महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र या कारवाईत सातत्य नसल्याने प्लास्टिकबंदी करण्यात आल्यानंतरही त्याची राजरोसपणे विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

मुळात ज्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांसह प्रतिबंधित वस्तू तयार केल्या जातात, तेथेच छापे टाकल्या पाहिजेत. मात्र पथकांकडून किरकोळ विक्रेते यांच्यावर आणि जेमतेम कारवाई केली जात आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदीचा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झालेला नाही.सदरची कारवाई आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, मुनीर फरास, करण लाटवडे, श्रीराज घोळकर, सुशांत कावडे, नंदकुमार पाटील यांनी केली. 

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर