शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कोदे बुद्रूकच्या फार्महाऊसमधील डान्सबारवर छापा, रिसॉर्ट मालकासह ४२ जण ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 13:03 IST

शासकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची रंगीत-संगीत पार्टी

गगनबावडा / कोल्हापूर : कोदे बुद्रूक पैकी आंबेवाडी (ता. गगनबावडा) येथील नयनील फार्महाऊस रिसॉर्टमधील डान्सबारवर छापा टाकून पोलिसांनी ११ नृत्यांगना आणि ४२ जणांना ताब्यात घेतले. बुधवारी (दि. ३०) रात्री उशिरा केलेल्या कारवाईत रिसॉर्टमधील दारू आणि मोबाइल असा साडेचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शाहूवाडी उपविभागाचे उपअधीक्षक आप्पासो पवार यांच्या पथकाने कारवाई केली. कोल्हापुरातील एका शासकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी रिसॉर्टमध्ये पार्टीचे आयोजन केले होते.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांकडून सुरू आहे. कोदे बुद्रूक पैकी आंबेवाडी येथील नयनील फार्महाऊस रिसॉर्टवर बेकायदेशीर डान्सबार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपअधीक्षक पवार यांनी तातडीने बुधवारी रात्री गगनबावडा पोलिसांच्या मदतीने फार्महाऊसवर छापा टाकून कारवाई केली.त्यावेळी अश्लील हावभाव करून नृत्य करणाऱ्या नृत्यांगना आढळल्या. तसेच विनापरवाना मद्यप्राशन करणारे तरुण आढळले. रंगीत-संगीत पार्टी करणाऱ्या ३१ जणांसह ११ नृत्यांगनांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रिसॉर्टमालक रूपेश सुर्वे (मंगळवार पेठ, कोल्हापूर) याच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईने गगनबावडा तालुक्यात निसर्गरम्य ठिकाणी सुरू असलेले अवैध धंदे समोर आले आहेत.उपअधीक्षक आप्पासो पवार यांच्यासह गगनबावडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, अंमलदार श्रीकांत मामलेकर, अमोल तेली, मानसिंग सातपुते, संदीप पाटील, सागर पाटील, अशोक पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

यांच्यावर झाली कारवाईफार्महाऊस मालक रूपेश सुर्वे (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) निखिल नंदकुमार सूर्यवंशी (वय ३८, रा. सुतारमळा, कोल्हापूर), शैलेंद्र सुरेश गोडबोले (५०, रा. सांगली), शेखर सुखदेव पाटील (३७, रा. पुणे), हरीश लक्ष्मण चौगले (२८, रा. कोल्हापूर), राजवर्धन रमाकांत साळोखे (३७, रा. गोरेगाव ईस्ट, मुंबई), सुहास दत्तात्रय घोरपडे (३८), रोहित नंदकुमार वीरभद्रे (३८, दोघे रा. हडपसर, पुणे, अमित रघुनाथ घोलप (रा. जाधववाडी, कोल्हापूर),

सतीश शिवाजी पाटील (३७, रा. सरनोबतवाडी, ता. करवीर), मंगेश अशोकराव ढोबळे (३५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), रोहन संजय माळी (३३, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ), जितेंद्र पांडुरंग पाटील (४१, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), अतिश अशोक हिराणी (३४, रा. टाकाळा चौक, कोल्हापूर), मोहन मारुतीराव हजेरी (३६, रा. पिंपरी, पुणे), रोहन जयसिंग निकम (४०, रा. सुतारमळा, कोल्हापूर), किरण राजाराम सूर्यवंशी (३८, रा. पुणे),

मुदस्सर अस्लम रुकडीकर (३८, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, सध्या रा. नवी मुंबई), गणेश दशरथ जाधव (४० रा. केळोशी बुद्रूक, ता. राधानगरी) परशुराम दगडू पाटील (२४), पांडुरंग बजरंग पाटील (२६), प्रकाश विलास पाटील (२३, तिघे रा. कोदे बुद्रूक) यांच्यावर कारवाई झाली. कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी पोलिसांकडे गयावया केल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस