राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध, कोल्हापुरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जोडा मारो आंदोलन

By संदीप आडनाईक | Updated: November 17, 2022 17:05 IST2022-11-17T16:43:18+5:302022-11-17T17:05:33+5:30

राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागावी आणि भारत जोडो यात्रा थांबवावी अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली.

Rahul Gandhi's statement against Savarkar, Balasaheb Shiv Sena strike movement in Kolhapur | राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध, कोल्हापुरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जोडा मारो आंदोलन

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध, कोल्हापुरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जोडा मारो आंदोलन

कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी वाशिम येथे भारत जोडोयात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य करुन टीका केली, त्याबद्दल बाळासाहेबांच्या शिवसेनेने गुरुवारी कोल्हापूरात गांधी यांचा जाहीर निषेध करीत जोडा मारो आंदोलन केले. यावेळी राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागावी आणि भारत जोडो यात्रा थांबवावी अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या या आंदोलनात शिवसेना पदाधिकाऱ्यांसह महिला पदाधिकारीही सहभागी झाल्या होत्या. यावेळी "जय भवानी, जय शिवाजी", "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार असो" अशा घोषणांनी हा चौक दणाणून सोडला.

यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, परिवहन सभापती राहुल चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगर समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, महानगरसमन्वयक पुजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, पूजा कामते, मंगल कुलकर्णी उपस्थित होते.

Web Title: Rahul Gandhi's statement against Savarkar, Balasaheb Shiv Sena strike movement in Kolhapur