शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरीचे तीन दरवाजे खुले: पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:23 IST

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाने काहीसी उसंत घेतली असली तरी पूर स्थिती कायम आहे. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने पूराच्या पाण्याची फूग कायम राहणार आहे.

ठळक मुद्देराधानगरीचे तीन दरवाजे खुलेपंचगंगेने इशारा पातळी ओलांडली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाने काहीसी उसंत घेतली असली तरी पूर स्थिती कायम आहे. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने पूराच्या पाण्याची फूग कायम राहणार आहे.गेली दोन दिवस जिल्ह्यात धुवादार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणक्षेत्रातही मुसळदार पाऊस असल्याने धरणातून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाण्याची पातळीत झपाट्याने वाढत आहे. पंचगंगेचने ३९ फुटाची इशारा पातळी ओलांडत धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे.

बुधवारी पावसाचा जोर जरी कमी असला तरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने पुराच्या पाण्याची फूग कायम राहणार आहे. ८१ बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्याची वहातूक पुर्णपणे विस्कळीत झाली आहे. इतर जिल्हा मार्ग २१, ग्रामीम मार्ग २४ असे ४५ मार्गावरील वहातूक विस्कळीत झाली असून यापैकी ९ मार्गावरील वहातूक पुर्णपणे खंडीत झाली आहे.राधानगरी धरण मंगळवारी रात्री भरल्यानंतर बुधवारी सकाळ पासून क्रमांक ३,५ व ६ असे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. यातून प्रतिसेकंद ४२८४ तर वीज निर्मितीसाठी १४०० असे प्रतिसेकंद ५६८४ घनफुट पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने या नदीचे पाणी विस्तीर्ण पसरले आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर