जांभळीत आईने मुलींसह केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:49 IST2020-12-15T18:48:58+5:302020-12-15T18:49:40+5:30
दोन चिमुरड्या मुलीसह आईने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे घडली. सुप्रिया शिवाजी भोसले (वय २४), मृणाली शिवाजी भोसले (वय ४), मृण्मयी शिवाजी भोसले (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

जांभळीत आईने मुलींसह केली आत्महत्या
जयसिंगपूर : दोन चिमुरड्या मुलीसह आईने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे घडली. सुप्रिया शिवाजी भोसले (वय २४), मृणाली शिवाजी भोसले (वय ४), मृण्मयी शिवाजी भोसले (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सुप्रिया भोसले या सोमवारी (दि. १४) दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलींना घेवून अंगणवाडीमध्ये उंची, वजन करण्याकरीता जातो, असे सांगून घरातून निघून गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत त्या घरी न आल्याने पती शिवाजी याने शोधाशोध सुरु केली.
जांभळीसह ठिकठिकाणी व नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतर त्या मिळून न आल्याने शिरोळ पोलिसांत बेपत्ताची तक्रार दिली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी जांभळी येथील पिराच्या मळ्यातील विहीरीत लहान मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर पोलिसांच्या रेस्क्यु टिमने शोधमोहीम राबवून सायंकाळी चारच्या सुमारास तीनही मृतदेह बाहेर काढले.