शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक बालकांना पल्स पोलिओ लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 3:17 PM

‘पोलिओ’चे कायमचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने रविवारी पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम दिवसभर राबविण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते बालकांना ‘पल्स पोलिओ’चा डोस पाजून सीपीआर रुग्णालयातून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्ह्यात तीन लाखांहून अधिक बालकांना पल्स पोलिओ लसीकरण पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ; शहरात ४२९८८ बालकांना डोस

कोल्हापूर : ‘पोलिओ’चे कायमचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने रविवारी पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम दिवसभर राबविण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते बालकांना ‘पल्स पोलिओ’चा डोस पाजून सीपीआर रुग्णालयातून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

दिवसभर जिल्ह्यात ० ते ५ वयोगटांतील सुमारे तीन लाखांहून अधिक बालकांना लसीकरण मोहिमेत ‘पोलिओ’चे डोस देण्यात आले, त्यापैकी कोल्हापूर शहरात सुमारे ४२९८८ बालकांना पोलिओ लस देण्यात आली. रविवारचा दिवस हा ‘राष्ट्रीय पोलिओ दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात सुरुवातीला पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर फित कापून आणि श्रीफळ वाढवून लसीकरण मोहिमेस प्रारंभ केला.

पालकमंत्र्यांच्या हस्ते बालकास ‘पल्स पोलिओ’चा डोस पाजण्यात आला. आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्तेही बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक विलास देशमुख, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कदम, आदी उपस्थित होते.जिल्ह्यात किमान साडेतीन लाख बालकांना पोलिओचे डोस पाजण्याचे उद्दिष्ट जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी केले होते. दिवसभरात सुदृढ, अशक्त, आजारी, नवीन जन्म, अशा सर्व ० ते ५ वयोगटातील मुलांना पोलिओ लस पाजण्यात आली.

दुपारपर्यंत जिल्ह्यात सुमारे २०८० बूथवर सुमारे तीन लाखांहून अधिक बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. त्यापैकी ग्रामीण भागात दोन लाखांपर्यंत बालकांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यात सुमारे २०८० बूथ उभारले होते, तर त्यापैकी २७९ बसस्टँडवरही बूथ उभा करून बालकांना लसीकरणाचे डोस देण्यात आले.

पोलिओ लसीकरणातून कोणतेही बालक सुटू नये; यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सक्रीय होती. बहुतांशी बालकांना बूथवर सकाळीच डोस देण्यात आले होते. यासाठी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळी यांच्या पथकाने विशेष सहकार्य केले.महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते शहरातील लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त धनंजय अांधळे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, माता-बालसंगोपन अधिकारी डॉ. अमोल माने, आदी अधिकारी उपस्थित होते.

शहरामध्ये ४८६८९ पैकी ४२९८८ बालकांना पोलिओ लस पाजली. उर्वरित मुलांना पुढील पाच दिवसांत घरोघरी लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी शहरात १७३ कें दे्र होती. महापालिकेच्या वतीने १२४१ कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.लसीकरणासाठी फिरती पथकेशहरामध्ये येणाऱ्या लाभार्थींना फिरत्या पथकामार्फत लस पाजण्यात आली. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, अंबाबाई मंदिर, शहरात येणारे रस्त्यावरील नाके, ऊसतोड कामगार वस्त्या, वीटभट्ट्या, मोठी बांधकामे या ठिकाणी लाभार्थींना लस पाजण्यात आली.पुढील पाच दिवस घरोघरी मोहीममोहिमेद्वारे काही बालके काही कारणास्तव डोस घेण्याचे चुकल्यास त्यांना पुढील पाच दिवस घरोघरी सर्व्हेसाठी पथके पाठवून त्यांनाही लस पाजण्यात येणार आहे.

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर