रविवारी शहरात पल्स पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:49+5:302021-02-05T06:58:49+5:30
कोल्हापूर : पोलिओ निर्मूलनाअंतर्गत नियमित लसीकरणाव्यतिरिक्त ० ते ५ वर्षापर्यंत बालकांना पोलिओ लसीचे जादा डोस दिले जातात. या वर्षी ...

रविवारी शहरात पल्स पोलिओ लसीकरण
कोल्हापूर : पोलिओ निर्मूलनाअंतर्गत नियमित लसीकरणाव्यतिरिक्त ० ते ५ वर्षापर्यंत बालकांना पोलिओ लसीचे जादा डोस दिले जातात. या वर्षी ४८ हजार ६३८ बालकांना ३१ जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मोफत पोलिओ डोस देण्यात येणार आहेत.
शहरातील ए, बी, सी, डी आणि ई या पाच वाॅर्डमध्ये एकूण ४४२ बुथवरून लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅन्डवर परगावावरून येणाऱ्या बालकांना डोस पाजण्यासाठी बुथ स्थापन केले जातील. शिवाय अंबाबाई मंदिर येथे खास बुथ ठेवण्यात येणार आहे.
कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर सॅनिटाईजर, सामाजिक अंतराचे पालन व इतर आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन लसीकरण केले जाईल. दि. १ ते ५ फेब्रुवारीपर्यंत घरभेटी करून डोसपासून वंचित राहिलेल्या बालकांना घरभेटीवेळी डोस दिले जाणार आहेत.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त संदीप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरसीएच नोडल ऑफिसर डॉ. अमोलकुमार माने आणि पल्स पोलिओ कार्यक्रम अधिकारी डॉ. रूपाली यादव काम पहात असून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समन्वयाने सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे.