शरद पवार, प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात प्रचार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 15:04 IST2019-03-15T15:03:28+5:302019-03-15T15:04:12+5:30

कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कॉँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत या महिन्याच्या अखेरीस होईल, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांना सांगितली.

Publicity started in Kolhapur in the presence of Sharad Pawar, Priyanka Gandhi | शरद पवार, प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात प्रचार प्रारंभ

शरद पवार, प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात प्रचार प्रारंभ

कोल्हापूर : कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कॉँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत या महिन्याच्या अखेरीस होईल, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांना सांगितली.

कोल्हापुरात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या आजी-माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.

कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रचाराचा प्रारंभ दि. २५ ते २७ मार्चदरम्यान कोल्हापुरातून करण्याचा पक्षीय पातळीवर विचार असून, त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. या प्रारंभास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कॉँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी यांनी यावे, अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

त्यामुळे खासदार महाडिकदेखील तसे प्रयत्न करीत आहेत. लवकरच त्याची तारीख आम्हांला कळेल, असे मुश्रीफ म्हणाले. कोल्हापुरात भाजप-शिवसेना युतीचा प्रचार प्रारंभ दि. २४ मार्चला होत आहे, त्यांच्यापेक्षा मोठी प्रचार सभा घेऊन आम्ही आमची ताकद दाखवू, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
 

 

Web Title: Publicity started in Kolhapur in the presence of Sharad Pawar, Priyanka Gandhi