शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

मॉरिशसच्या विश्व हिंदी संमेलनात मराठी पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 13:17 IST

मॉरिशस येथे भरलेल्या ११ व्या विश्व हिंदी संमेलनामध्ये डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित ‘वाचन’ या मराठी पुस्तकाचे सन्मानपूर्वक प्रकाशन स्वीडन येथील उप्साला विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. हाईन्स वसलर यांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मॉरिशस येथील विश्व हिंदी सचिवालयाचे महासचिव डॉ. विनोदकुमार मिश्र होते.

ठळक मुद्देमॉरिशसच्या विश्व हिंदी संमेलनात मराठी पुस्तकाचे प्रकाशनसंमेलनासाठी ४0 देशांचे २000 प्रतिनिधी उपस्थित

कोल्हापूर : मॉरिशस येथे भरलेल्या ११ व्या विश्व हिंदी संमेलनामध्ये डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित ‘वाचन’ या मराठी पुस्तकाचे सन्मानपूर्वक प्रकाशन स्वीडन येथील उप्साला विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. हाईन्स वसलर यांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मॉरिशस येथील विश्व हिंदी सचिवालयाचे महासचिव डॉ. विनोदकुमार मिश्र होते.मॉरिशसमधील पोर्ट लुईस येथे १८ ते २0 आॅगस्ट या दरम्यान हे विश्व हिंदी संमेलन पार पडले. विश्व हिंदी सचिवालयाच्या नुक त्याच उभारण्यात आलेल्या विशाल भवनातील सभागृहामधील हा पहिलाच पुस्तक प्रकाशन समारंभ होता आणि हा मान एका मराठी पुस्तकाला मिळाला. यावेळी डॉ. हाईन्स वसलर म्हणाले, जागतिकीकरणाच्या गतीत वाचन हरवते आहे. अशा काळात वाचनाचा शास्त्रीय विचार आवश्यक आहे; त्यामुळेच वाचक प्रगल्भ होऊ शकेल.प्रा. विनोद मेंधी यांनी यावेळी मराठी येत नसतानाही या पुस्तकातील एका परिच्छेदाचे उत्स्फूर्त वाचन केले आणि त्याचा लगेचच हिंदी अनुवादही केला. ते म्हणाले, मराठी आणि हिंदी या भाषाभगिनी असून दोन्ही भाषांमध्ये ८0 टक्के शब्द समान आहेत. फक्त ऱ्हस्व, दीर्घ आणि क्रियापद रूपे भिन्न आहेत. वाचनाची व्याकरणीकता समान असल्याने हे पुस्तक उभयपक्षी समान भारतीय भाषी केवळ वाचन नाही तर समजू पण शकतात.या समारंभावेळी फिजीचे भारतीय उच्चायुक्त, फिजीचे शिष्टमंडळ सदस्य, महात्मा गांधी संस्थान मॉरिशसचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. विनय गुदारी, बुडापेस्ट विद्यापीठाचे हिंदी विभागप्रमुख प्रा. पीटर शानी, गोहाटी विद्यापीठ आसामचे प्रा. दिलीप मैंधी, मिझोराम विद्यापीठातील प्रा. सुशीलकुमार शर्मा, आदी मान्यवर उपस्थित होते. या संमेलनासाठी ४0 देशांचे २000 प्रतिनिधी उपस्थित होते.

पुस्तक अनिल मेहता यांना अर्पणडॉ. सुनीलकुमार लवटे यांनी हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांना त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त अर्पण केले आहे. भाग्यश्री प्रकाशनाच्या संचालिका भाग्यश्री पाटील यांनी त्यांचे पहिले प्रकाशन जागतिक मंचावर प्रकाशित झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या पुस्तक निर्मितीसाठी ‘अक्षरदालन’ चे अमेय जोशी, चित्रकार गौरीश सोनार यांचे सहकार्य लाभले. 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर