शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

‘भीक मांगो’ आंदोलनाद्वारे निषेध, जमलेले पैसे जावडेकरांना पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 16:37 IST

केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी शाळांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘एआयवायएफ’ आणि ‘एआयएसएफ’च्या कार्यकर्त्यांनी ‘भीक मांगो’ आंदोलन केले.

ठळक मुद्देराजीनाम्याची मागणी; ‘एआयवायएफ’च्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

कोल्हापूर : ‘प्रकाश जावडेकरांचा धिक्कार असो’, ‘भाजप सरकार चले जाव’, असा घोषणा देत ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ) आणि ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनने (एआयएसएफ) रविवारी बिंदू चौकात ‘भीक मांगो’ आंदोलनाद्वारे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचा निषेध केला.

केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी शाळांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘एआयवायएफ’ आणि ‘एआयएसएफ’च्या कार्यकर्त्यांनी ‘भीक मांगो’ आंदोलन केले. त्यांनी मंत्री जावडेकर यांचे छायाचित्र कटोऱ्यात ठेऊन, त्याच्या छायाचित्रावर भिकारी असे लिहून हे आंदोलन केले. यावेळी या कार्यकर्त्यांनी ‘शिक्षण आमच्या हक्काचे’, ‘प्रकाश जावडेकर राजीनामा द्या’, ‘निधी आमच्या हक्काचा’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी ‘एआयवायएफ’चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे म्हणाले, जनता सरकारला विविध कररूपाने पैसे देत त्यातूनच सरकार जनतेला शैक्षणिक, आरोग्यविषयक सुविधा देते. त्यामुळे शिक्षणाच्या सुविधेसाठी शाळांनी निधी मागणीला मंत्री जावडेकर यांनी भीक मागणे म्हणणे चुकीचे आहे. या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव नामदेव गावडे, ‘एआयएसएफ’चे जिल्हा सचिव प्रशांत आंबी, आरती रेडेकर, धीरज कटारे, हरिश कांबळे, दिलदार मुजावर, शिवप्रसाद शेवाळे, अमोल पांढरे, राजवैभव कांबळे, अमोल देवडकर, अमित समुद्रे, आनंद सातपुते, कृष्णा पानसे, योगेश कसबे, शुभम कुंभार, महादेव शिंगे, आदी सहभागी झाले.जमलेले पैसे जावडेकरांना पाठविणारकेंद्रीय मंत्री जावडेकर यांनी ‘शाळांनी सरकारकडे कटोरा घेऊन भीक मागण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडून पैसे घ्यावेत.’ अशा स्वरूपातील वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ आणि त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम्ही ‘भीक मांगो’ आंदोलन आहे. या आंदोलनातून जमलेले पैसे आम्ही मंत्री जावडेकर यांना धनादेशाद्वारे पाठविणार आहोत, असे गिरीश फोंडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी