कोल्हापुरात रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पणती लावून आंदोलन, उद्धवसेनेने वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:42 IST2025-10-20T17:41:01+5:302025-10-20T17:42:29+5:30
रस्त्यांसाठी खर्च केलेल्या निधीची चौकशी करा

छाया : नसीर अत्तार
कोल्हापूर : रस्त्यांसाठी खर्च केलेल्या निधीची चौकशी करावी, या मागणीसाठी खड्ड्यामध्ये पणती लावून उद्धवसेनेच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री अभिनव आंदोलन करत रस्त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले. यावेळी आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी घोषणा देत सरकारचा निषेध केला. जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
दिवाळीच्या सणाला नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नवीन वाशी नाका परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यात रांगोळ्या काढून तसेच पणत्या लावून उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री शहरातील सर्वच रस्त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधून घेतले.
या आंदोलनात विशाल देवकुळे, सागर साळोखे, हर्षल पाटील, पप्पू नाईक, समरजित जगदाळे, अमित पै, गोविंद वाघमारे, विकास बुरबुसे, संजय खराटे, जयंवत पाटील, रुद्र पाटील, भूषण मिटके आदी उपस्थित होते.