- संदीप आडनाईककोल्हापूर : शहरात फुलेवाडी रिंग रोडवर बुधवारी संरक्षित व अत्यंत धोक्यात असलेला ‘स्पाईन टेल डेव्हिल रे’ (शास्त्रीय नाव मोबुला मोब्युलर) हा दुर्मिळ समुद्री मासा विक्रीसाठी आणल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार करवीर (कोल्हापूर) परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी तत्काळ छापा टाकून संबंधित मासा जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा मासा एका मासे विक्री करणाऱ्या कंपनीने बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवला होता. या माशाला पाकड किंवा वागळ असे स्थानिक नावाने ओळखले जाते. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून हा मासा हस्तगत केला. हा मासा १३० किलो वजनाचा असून तो १३० रुपये किलो दराने विकण्यात येणार होता. यासंदर्भात माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वन विभागाने छापा टाकला. बुधवारी दुपारी एक वाजल्यानंतर हा मासा विकला जाणार होता. त्यापूर्वी तो लोकांना पाहायला ठेवला होता. वन विभागाने संबंधित व्यक्तीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, संरक्षित वन्यजीवांची खरेदी-विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तत्काळ वनविभागाला कळवावी.या कारवाईमुळे बेकायदेशीर वन्यजीव व्यापारावर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नामशेष होत चाललेली प्रजातजागतिक स्तरावर विस्तृत प्रसार असला तरी या प्रजातीची संख्या विखुरलेली आहे. ही नामशेष होत चाललेली प्रजात असून काही भागांत, विशेषतः उत्तर-पश्चिम भूमध्य समुद्रात हवाई सर्वेक्षणानुसार सुमारे १२,७०० इतकी संख्या शिल्लक असल्याने आययुसीनच्या यादीत समाविष्ट आहे.
Web Summary : Forest officials in Kolhapur seized a protected 'Spine Tail Devil Ray' being illegally sold. The 130 kg ray, locally known as Pakad or Waghal, was to be sold for ₹130/kg. A case has been registered under the Wildlife Protection Act, 1972.
Web Summary : कोल्हापुर में वन विभाग के अधिकारियों ने अवैध रूप से बेची जा रही एक संरक्षित 'स्पाइन टेल डेविल रे' को जब्त किया। स्थानीय रूप से पाकाड या वाघल के रूप में जानी जाने वाली 130 किलो की रे मछली को ₹130/किलो में बेचा जाना था। वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 के तहत मामला दर्ज किया गया है।