शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुराने वेढलेल्या १३ गावांच्या स्थलांतराचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 10:36 IST

महापुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढले गेलेल्या जिल्ह्यातील १३ गावांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून या १३ गावांमध्ये गावसभा घेऊन ग्रामस्थांचे मत जाणून घेतले जात आहे; मात्र बहुतांशी ठिकाणी ग्रामस्थांनी गाव सोडण्याची मानसिकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देपुराने वेढलेल्या १३ गावांच्या स्थलांतराचा प्रस्तावगावसभांचे आयोजन, मात्र गाव सोडण्यास ग्रामस्थ नाखूश

समीर देशपांडे

कोल्हापूर : महापुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढले गेलेल्या जिल्ह्यातील १३ गावांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून या १३ गावांमध्ये गावसभा घेऊन ग्रामस्थांचे मत जाणून घेतले जात आहे; मात्र बहुतांशी ठिकाणी ग्रामस्थांनी गाव सोडण्याची मानसिकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.जिल्ह्यातील २४९ गावे सुरुवातीच्या टप्प्यात पूरबाधित होती. तो आकडा आता ३८६ वर गेला आहे. यामधील २७ गावांचा संपर्क तुटला होता, तर १३ हून अधिक गावे चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेली होती. या गावांची अवस्था इतकी बिकट झाली होती, की शेवटच्या टप्प्यात ग्रामस्थांना गावाबाहेर काढणेही जिकीरीचे बनले होते. काही ठिकाणी ग्रामस्थांनी जनावरे असल्याने बाहेर पडण्यास नकार दिल्यानंतर त्यांना जीवनावश्यक वस्तूही पोहोचविण्यात आल्या.पूर ओसरल्यानंतर मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने हालचाली सुरू ठेवल्या आहेत. पूर कमी आला आहे, म्हणून निवांत न राहता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तातडीने जिल्ह्यातील प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना आदेश काढून जिल्ह्यातील १३ गावांच्या पुनर्वसनासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.या गावांमध्ये सन १९८९, २00५ आणि २0१९ मध्ये आलेल्या पुरात गावातील घरांमध्ये किती प्रमाणात पाणी जाऊन हानी झाली आहे, किती घरे पूर्ण, अंशत: पडलेली आहेत आणि किती राहण्यास योग्य नाहीत, याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून, गावामध्ये पुराने झालेली हानी त्याचप्रमाणे स्थलांतरित होण्याबाबतची तयारी विचारात घेऊन पुनर्वसन करण्याबाबत अहवाल द्यावा, तसेच संपूर्ण गाव स्थलांतरित होण्यासाठी तयार नसल्यास अतिपूरबाधित ठिकाणे किंवा विशिष्ट भागातील ग्रामस्थ पुनर्वसनासाठी तयार आहेत का? याची पाहणी करण्याचे आदेश दौलत देसाई यांनी दिले आहेत.या गावांच्या स्थलांतराचा प्रस्तावकरवीर तालुक्यातील आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे, तर शिरोळ तालुक्यातील टेकवाडी, खिद्रापूर, राजापूरवाडी, हसूर, राजापूर, अर्जुनवाड, कुटवाड, बस्तवाड, निलेवाडी, कनवाड.ग्रामस्थांचा संपूर्ण स्थलांतरास विरोधज्या गावांमध्ये पिढ्यान्पिढ्या गेल्या, ते गाव जमीन जुमला सोडून जाण्यासाठी मात्र ग्रामस्थ तयार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी गावसभांमध्ये स्थलांतरासाठी विरोधही होत आहे. शासन देणार एक-दीड गुंठा जागा. आम्ही घर, जनावरे एवढ्यात कशी बांधायची असेही ग्रामस्थांचे काही मुद्दे आहेत. वर्षानुवर्षे नांदणारे घर सोडून पूरकाळातील आठ-१0 दिवसांसाठी परक्या ठिकाणी पुन्हा नवी सुरुवात करण्याची ग्रामस्थांची मानसिकता नसल्याचे स्पष्ट होत आहे.

महापुरामुळे पूर्णपणे वेढल्या गेलेल्या गावांच्या स्थलांतराबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेतली जात आहेत. या ग्रामस्थांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याची शासनाची भूमिका आहे; परंतु त्यासाठी त्यांची कितपत तयारी आहे, याचाही विचार होण्याची गरज आहे. म्हणूनच माझ्या विभागाचे अधिकारी गावोगावी गावसभा घेत आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतर पुढच्या प्रक्रियेची दिशा ठरवली जाईल.दौलत देसाईजिल्हाधिकारी, कोल्हापूर 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरcollectorजिल्हाधिकारी