शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याकडे सापडली ३४.५० लाखांची संपत्ती

By admin | Updated: January 21, 2015 23:53 IST

कोल्हापुरातही एक सदनिका असून, त्याची किमत ५.५० लाख असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून देण्यात आली.

सातारा : दोन हजारांची लाच घेताना जाळ्यात सापडलेल्या उपअभियंता श्रीकांत रामचंद्र चौगुले याच्याकडे ३४.५० लाखांची मालमत्ता आढळून आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा येथील कार्यालयातून देण्यात आली.दरम्यान, श्रीकांत चौगुलेवर रात्री उशिरा कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक झाली. बुधवारी सातारा न्यायालयात हजर केले असता जामिनावर मुक्तता झाली. श्रीकांत चौगुले (सध्या रा. जिल्हा परिषद क्वार्टर सदनिका क्रमांक ५, जिल्हा परिषदेच्या पाठीमागे, सातारा. मूळ रा. गगणगिरी हौसिंग सोसायटी, प्लॉट नंबर १७/१, कदमवाडी, भोसलेवाडी, कोल्हापूर) हा कोरेगाव पंचायत समितीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागात उपअभियंता आहे. त्यांने तक्रारदाराकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतंर्गत वैयक्तिक विहीर बांधकामाची पाहणी करून तसा अहवाल देण्यासाठी दोन हजारांची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. चौगुले याला मंगळवारी लाचलुचपतच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लाच घेताना जाळ्यात पकडले. दरम्यान, या घटनेनंतर चौगुले याचा पुण्यामध्ये एक फ्लॅट असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे एसीबीचे पथक येथे झडतीसाठी गेले होते. येथे काही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली नसली तरी त्याची किमत २९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. चौगुले याची कोल्हापुरातही एक सदनिका असून, त्याची किमत ५.५० लाख असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून देण्यात आली. (प्रतिनिधी)