शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
3
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
4
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
5
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
6
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
7
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
8
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
9
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
10
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
11
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
12
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
13
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
14
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
15
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
16
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
17
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
18
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
19
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
20
भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेची निवडणूक लांबणीवर

By admin | Updated: July 30, 2015 00:31 IST

दिवाळीनंतरच शक्य : न्यायालयीन वाद व दुष्काळाचे कारण

विश्वास पाटील -राज्यात दुष्काळाची स्थिती असल्याचे कारण पुढे करून सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने राज्य सहकारी बँकेची निवडणूकही पुढे गेली आहे. या बँकेचा निवडणूक कार्यक्रम दीड महिन्यापूर्वीच मंजुरीसाठी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविला आहे. परंतु, न्यायालयीन वाद व आता सरकारची भूमिका, यामुळे ही निवडणूक होऊ शकलेली नाही. या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. बँकेवर २०१३ मध्ये प्रशासक नियुक्त केल्याने तिथे आता संचालक मंडळ अस्तित्वात नाही.संचालक मंडळाच्या संख्येबाबत नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. ही निवडणूक ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सहकार निवडणूक प्राधिकरणाचा प्रयत्न होता; परंतु या याचिकेमुळे खो बसला. बँकेच्या संचालक मंडळासंबंधी नागपूर खंडपीठात दाखल याचिकेची सुनावणी २२ जुलैला होती; परंतु त्यादिवशी न्यायाधीश रजेवर असल्याने याचिका सुनावणीसाठी आली नाही. पुढील तारीख दिल्याची माहिती याचिकाकर्ते अरविंद पोरड्डीवार यांनी दिली. प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती बँकेस राज्य बँकेच्या संचालक मंडळावर प्रतिनिधित्व मिळावे, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. यासंदर्भात सरकारने म्हणणे मांडावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.मुदत संपलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँका व राज्य बँकेची निवडणूकही ३० जूनपूर्वी घेण्याची हमी राज्य शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती. त्यानुसार जिल्हा बँकांच्या निवडणुका झाल्या; परंतु राज्य बँकेची निवडणूक मतदारयादी पूर्ण होऊनही लटकली. सहकार निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक अधिकारी म्हणून विभागीय सहनिबंधक विकास रसाळ यांची नियुक्तीही केली आहे. पूर्वी बँकेचे संचालक मंडळ ४८ जणांचे होते; परंतु नव्या सहकार कायद्यानुसार ही संख्या २१ पर्यंतच मर्यादित केली. त्याला पोरड्डीवार यांनी गडचिरोली जिल्हा बँकेचे संचालक जागोबा खेडकरेंमार्फत नागपूर खंडपीठात आव्हान दिले. संचालक मंडळाची संख्या वाढविण्याची मागणी ही पोटनियमाला नव्हे, तर थेट महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या ९७ व्या घटनादुरुस्तीस आव्हान देणारी आहे. अद्याप आदेश नाहीदुष्काळामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा शासनाचा विचार असल्याचे सांगण्यात येते; परंतु तसा कोणताही आदेश आमच्याकडे या क्षणापर्यंत आलेला नाही, असे सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.अंतिम मतदार यादी १३ मे २०१५ रोजी प्रसिद्धएकूण मतदार : २०८२पात्र मतदार : १३६९