दूध खरेदी दरातील वाढ सरकारची घोडचूक, अरूण नरके यांनी व्यक्त केले परखड मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 15:47 IST2017-12-11T15:33:33+5:302017-12-11T15:47:35+5:30

अतिरिक्त दूध असताना व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावडर, बटरचे दर कोसळलेले असताना दूध खरेदी दरातील प्रतिलिटर तीन रूपयांची वाढ ही सरकारची घोडचूक आहे. असे परखड मत इंडियन डेअरी असोसिशनचे अध्यक्ष अरूण नरके यांनी व्यक्त केले.

Proliferation of milk procurement boosts the government's turmoil, the perilous opinion expressed by Arun Narve | दूध खरेदी दरातील वाढ सरकारची घोडचूक, अरूण नरके यांनी व्यक्त केले परखड मत

अरूण नरके

ठळक मुद्देपुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने आयोजित ‘कात्रज डेअरी एक्स्पो’माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दूध उत्पादक संघाचा कार्यक्रम

कोल्हापूर : अतिरिक्त दूध असताना व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावडर, बटरचे दर कोसळलेले असताना दूध खरेदी दरातील प्रतिलिटर तीन रूपयांची वाढ ही सरकारची घोडचूक आहे. असे परखड मत इंडियन डेअरी असोसिशनचे अध्यक्ष अरूण नरके यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने आयोजित माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कात्रज डेअरी एक्स्पो’च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

नरके म्हणाले, गाय दूध खरेदी दरात तीन रूपये वाढ केल्याने कमीत कमी प्रतिलिटर २७ रूपये दर द्यावा लागतो. संघाची परिस्थिती नसतानाही सरकारचा आदेश म्हणून खासगी व सहकारी दूध संघांनी दरवाढ केली. त्यामुळे ‘गोकुळ’ दूध संघाला २५ कोटीचा तोटा सहन करावा लागला. तो सहन करण्याची ताकद ‘गोकुळ’कडे असल्याने फार ते पेलले. पण इतर खासगी व सहकारी संघांची गोची झाली आहे.

दूध उत्पादकांना आधूनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी ‘एक्स्पो’ चे आयोजन गरजेचे आहे. मात्र यासाठी येणाऱ्या खर्चाचा निम्मा भार सरकार तर २५ टक्के भार दूध महासंघाने उचलला पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.

पुणे विभागाचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी महेश मुळे म्हणाले, दूधाचा उत्पादन खर्च प्रतिलिटर ३५ ते ४० रूपये असताना चोवीस रूपये भाव दिला जातो. त्यात या सरकारने तीन रूपये वाढ करून उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.

हा निर्णय दूध संघांना मारक ठरत असेल तर या क्षेत्रातील अभ्यासकांनी आपली भूमिका सरकारला पटवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माजी खासदार अशोक मोहोळ, ‘महानंदा’चे माजी अध्यक्षा वैशाली नागवडे, वर्षा शिवले, आदी उपस्थित होते.
 

Web Title: Proliferation of milk procurement boosts the government's turmoil, the perilous opinion expressed by Arun Narve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.