शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
3
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
4
"मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
5
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
6
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
7
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
8
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
9
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
10
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
12
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
13
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
15
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
16
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
17
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
18
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
20
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?

वीस-वीस वर्षांपासून प्राध्यापक सेवेवर गैरहजर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 3:32 PM

अशा प्राध्यापकांनी कर्तव्यावर हजर व्हावे यासाठी वृत्तपत्राद्वारे नोटीस प्रसिद्ध करण्याची वेळ वैद्यकीय शिक्षण विभागावर आली

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील १६ प्राध्यापक व सहयाेगी प्राध्यापक विनापरवानगी, अनधिकृतपणे दीर्घ काळापासून गैरहजर आहेत. अशा प्राध्यापकांनी कर्तव्यावर हजर व्हावे यासाठी वृत्तपत्राद्वारे नोटीस प्रसिद्ध करण्याची वेळ वैद्यकीय शिक्षण विभागावर आली आहे. १९ जूनला ही नोटीस वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे यातील काही प्राध्यापक गेल्या २० वर्षांपासून संबंधित महाविद्यालयामध्ये कामावर गैरहजर आहेत. यात कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील तीन प्राध्यापकांचा समावेश आहे. यात नागपूरच्या शासकीय महाविद्यालयातील २, अंबाजोगाई येथील ३, मिरज येथील १, औरंगाबाद येथील ३ तसेच मुंबई, चंद्रपूर, धुळे व यवतमाळच्या महाविद्यालयातील प्रत्येकी एका प्राध्यापकाचा समावेश आहे.

१५ दिवसांची मुदत

या प्राध्यापकांना कर्तव्यावर हजर राहण्यासाठी नाेटिसीच्या दिवसापासून १५ दिवसांची मुदत दिली आहे. संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात १५ दिवसांत हजर व्हावे, त्यासंदर्भातील रुजू अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे सादर करावा. या मुदतीत रुजू न झाल्यास ते अध्यापकीय पदावर काम करण्यास इच्छुक नसल्याचे गृहीत धरून त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल, असे या नोटिसीत म्हटले आहे.

बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने नोटीसशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांच्या वारंवार बदल्या होतात. अपेक्षेनुसार बदलीचे ठिकाण मिळाले नाही, तर अनेक जण बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाहीत. मात्र, मूळ आस्थापनेतून त्यांना आधीच पदमुक्त केलेले असते. या १६ जणांमध्ये अशांची संख्या जास्त असल्याचे समजते.

जागांची अडवणूक कशासाठीवैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर अनेक जण परीक्षेच्या माध्यमातून शासकीय महाविद्यालयांमध्ये अध्यायनासाठी रुजू होतात. त्याचवेळी ते बाहेर खासगी प्रॅक्टिसही करतात. त्यात ते स्थिरस्थावर झाले की महाविद्यालयांकडे फिरकतही नाहीत. राजीनामा न देता ते गैरहजर राहत असल्याने कागदोपत्री ते महाविद्यालयात कार्यरत असल्याचे दिसते. मात्र, वास्तवात ते हजर नसल्याने संबंधित महाविद्यालयाच्या दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होतो. शिवाय रिक्त जागा दिसत नसल्याने नवीन भरतीही करता येत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMedicalवैद्यकीयProfessorप्राध्यापक