आंबा : नेपाळी बाग कामगारांना घेवून कोकणात निघालेली खासगी बस आंबा घाटात चक्री वळणावर संरक्षण कठडा तोडून ८० फूट खोल दरीत कोसळली. केवळ दैव बलवत्तर दरीतील झाडीत गाडी अडकल्याने सर्व प्रवाशी बचावले. आज, शुक्रवारी (दि.५) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेपाळमधील बाग कामगार मध्यप्रदेशमधून खासगी बस क्रमांक (एमपी.१३.पी. १३७) मध्यरात्री कोल्हापूर हून रत्नागिरीला निघाली होती. गाडीत ११५ प्रवासी बसवले होते. घाटात चालकाच्या डोळ्यावर झापड आल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने संरक्षण कठडा तोडून ८० फूट खोल दरीत कोसळली. दरीत झाडामध्ये बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला. यात काही प्रवाशी जखमी झाले. जखमींना साखरपामधून रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलिस व आंब्यातील तरुणाचे मदत पथक तासाभरात पोहचले. चोवीस जखमींना रस्त्यावर घेवून साखरपा रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास साखरपा पोलीस करीत आहेत. आंब्यातील भाई पाटील दिनेश कांबळे, दिग्वीजय गुरव ,दिपक भोसले, तुषार पाटील यांनी मदत केली.गाडीत दुप्पट प्रवाशी बसची क्षमता ६० असताना गाडीत दुप्पटीने प्रवाशी बसवले होते. दरीत गाडी कोसळली तेव्हा सर्व झोपेत होते. दरीत बस कोसळताच एकच गोंधळ उडाला.
Web Summary : A private bus carrying Nepalese workers plunged into a valley in Amba Ghat near Kolhapur after the driver lost control. Though the bus fell 80 feet, trees prevented a major disaster. Several passengers were injured and admitted to Ratnagiri hospital.
Web Summary : कोल्हापुर के पास आंबा घाट में नेपाली मजदूरों को ले जा रही एक निजी बस चालक के नियंत्रण खो देने से घाटी में गिर गई। बस 80 फीट नीचे गिरी, लेकिन पेड़ों ने एक बड़ी आपदा को टाल दिया। कई यात्री घायल, रत्नागिरी अस्पताल में भर्ती।