मुद्रणालय, बांधकाम प्रयोगशाळा, सभागृह उभारणार; कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ४३ कोटी ६५ लाखांचे अंदाजपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:00 IST2025-03-25T17:00:20+5:302025-03-25T17:00:31+5:30

उत्पन्नवाढीसाठी कृती कार्यक्रम  

Printing press, construction laboratory, auditorium to be built Kolhapur Zilla Parishad's budget of Rs. 43 crore 65 lakhs | मुद्रणालय, बांधकाम प्रयोगशाळा, सभागृह उभारणार; कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ४३ कोटी ६५ लाखांचे अंदाजपत्रक

मुद्रणालय, बांधकाम प्रयोगशाळा, सभागृह उभारणार; कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ४३ कोटी ६५ लाखांचे अंदाजपत्रक

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे सन २०२५/२६ साठी ४३ कोटी ६५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस. यांनी सोमवारी सादर केले. एकीकडे सर्वांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना जाहीर करतानाच उत्पन्नवाढीसाठी मुद्रणालय, बांधकाम प्रयोगशाळा आणि सभागृह उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण सभेत या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुणा हसबे यांनी वित्त विभागाच्या कर्मचाऱ्यांसह कार्तिकेयन यांना अर्थसंकल्पाची बॅग सादर केली. अर्थसंकल्प पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्तिकेयन यांनी जिल्हा परिषदेच्या योजना आणि तरतुदींचा आढावा घेतला.

कार्तिकेयन म्हणाले, शेवटचे गाव आणि शेवटचा माणूस याच्यापर्यंत योजना पोहोचवणे, योजनांमध्ये महिलांना प्राधान्य देणे आणि समृद्ध अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याची तीन उद्दिष्टे समोर ठेवून आम्ही नियोजन केले आहे. हा अर्थसंकल्प तयार करताना आम्ही ‘सर्वसमावेशक, सशक्त आणि समृद्ध कोल्हापूर’ ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवली आहोत. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

ज्ञान एक शक्ती, शिक्षण आणि प्रगती
उज्ज्वल भविष्यासाठी, हीच खरी नीती

अशा कवितेच्या ओळीही कार्तिकेयन यांनी सादर केल्या.

उत्पन्नवाढीसाठी हे करणार

  • जिल्हा परिषद स्वत:चे मुद्रणालय सुरू करणार. यामुळे वर्षाला १ ते २ कोटींची उत्पन्नवाढ अपेक्षित
  • बांधकाम विभाग स्वत:ची प्रयोगशाळा उभारणार. त्यासाठी ४० लाखांची तरतूद, पाच कोटींच्या उत्पन्नवाढीची अपेक्षा
  • भाऊसिंगजी रोडवर चार मजली व्यापारी संकुल, शासनाकडे १९ कोटींचा प्रस्ताव
  • व्यायामशाळेचे आधुनिकीकरण करून भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय


नावीन्यपूर्ण योजना

  • समृद्ध शाळा योजनेअंतर्गत भौतिक सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद
  • स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सव्वा कोटी रूपयांची तरतूद
  • पशुवैद्यकीय दवाखाने समृद्ध करण्यासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद
  • दिव्यांगांसाठी तीन चाकी बॅटरीवरील सायकल्स घेण्यासाठी ३५ लाख रुपयांची तरतूद


मालमत्तांचा डॅश बोर्ड होणार तयार

जिल्हा परिषदेच्या सर्व मालमत्तांची माहिती एकाच डॅश बोर्डवर उपलब्ध व्हावी म्हणून डिजिटल ॲसेट मॅनेजमेंट मेन्टेनन्स सिस्टीम राबविण्यात येणार आहे. मालमत्तांची सद्यस्थिती यातून समजणार असून भाडेतत्त्वावरील मालमत्तांचे ऑनलाईन भाडे जमा करण्यापर्यंतची माहिती यावर अद्ययावत राहणार आहे.

‘मेन राजाराम’साठी ६ कोटी रुपये

मेन राजाराम हायस्कूलला ‘ऑक्सफर्ड ऑफ दि इस्ट’ करण्याचा मनोदय यावेळी कार्तिकेयन यांनी बोलून दाखवला. यासाठी सहा कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद न करता या ठिकाणी विद्यार्थीसंख्या वाढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

विभागनिहाय तरतुदी

  • शिक्षण विभाग, रक्कम रुपयांमध्ये १ बॅ. बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षेसाठी १० लाख रुपयांची तरतूद
  • जि.प./माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा, अध्यक्ष चषक ७ लाख
  • डॉ. विक्रम साराभाई जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा ५ लाख
  • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार ४ लाख
  • डॉ. जयंत नारळीकर विज्ञान जाणीव जागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या संशोधन केंद्रांच्या भेटीसाठी २ लाख


बांधकाम विभाग

  • रस्ते सुधारणा ६० लाख
  • जिल्हा परिषद आवारातील क्रीडाविषयक बाबींसाठी २० लाख
  • शिवराज्याभिषेक सोहळा समारंभ ७ लाख


आरोग्य विभाग

  • सर्प व श्वानदंश लसी, औषधे, साधनसामुग्री उपकरणे ४० लाख
  • जैविक घनकचरा विघटन करणे १० लाख
  • ग्राम आराेग्य संजीवनी, आशा संजीवनी कार्यक्रम ५ लाख
  • छाेटे फ्रीज १७ लाख
  • प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वाहने देखभाल दुरुस्ती, इंधन २० लाख


कृषि विभाग

  • पाचटकुट्टी मशीन, मल्चर पुरवणे ३० लाख
  • शेतकऱ्यांना सुधारित औजारे, जलसिंचन साधने पुरवणे ३५ लाख
  • शेतकऱ्यांना पीव्हीसी, एचडीपीई पाईप पुरवणे ३० लाख
  • बायाेगॅस बांधकाम पूरक अर्थसहाय्य ३६ लाख


पशुसंवर्धन विभाग

  • कडबाकुट्टी मशीन पुरवणे ५० लाख
  • वंध्यत्व निवारण योजनेतून औषधे, क्षारमिश्रणे पुरवठा ३० लाख
  • जंतनाशके खरेदी, गोचीड, गोमाशी निर्मूलन, श्वान प्रतिबंधक लस २० लाख
  • पशुवैद्यकीय दवाखान्यांना आवश्यक हत्यारे, औजारे १५ लाख रुपये


समाजकल्याण विभाग

  • मागासवर्गीय महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी साहित्य पुरवणे ५६ लाख
  • मागासवर्गीयांना शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी ३५ लाख
  • स्वयंरोजगारासाठी साधने, उपकरणे २० लाख
  • अनुदानित वसतिगृहांना सोयी, सुविधा ५० लाख
  • विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य २० लाख
  • महिलांना स्वयंरोजगारासाठी साहित्य ५० लाख
  • १ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ५० लाख
  • मागासवर्गीय मुलींना सायकल पुरवणे १५ लाख


दिव्यांग कल्याण विभाग

  • दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी साधने व उपकरणे ६० लाख
  • दिव्यांग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य १८ लाख
  • अतितीव्र दिव्यांगांच्या पालकांना अर्थसहाय्य १० लाख


महिला व बालकल्याण विभाग

  • मुली, महिलांना व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षणासाठी ४० लाख
  • ७ वी ते १२ वी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी ५५ लाख
  • महिलांना स्वयंरोजगारासाठी साधने व उपकरणे पुरवणे ४० लाख
  • ५ वी ते १२ वी मुलींना सायकल पुरवणे २० लाख


पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

  • डोंगराळ भागातील नैसर्गिक झऱ्याभोवती संरक्षक कुंड, पाणी वितरण ४० लाख
  • विश्रामगृहे, स्टोअर्स ठिकाणी विंधन विहिरी ५ लाख
  • पंचगंगा नदी प्रदूषण २७ लाख


पाटबंधारे विभाग
पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्ती व गाळ काढणे ४० लाख

ग्रामपंचायत विभाग
राजर्षी छत्रपती शाहू महाराज वसुंधरा ग्रामपंचायत या योजनेसाठी १९ लाख
यशवंत सरपंच पुरस्कार १९ लाख

Web Title: Printing press, construction laboratory, auditorium to be built Kolhapur Zilla Parishad's budget of Rs. 43 crore 65 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.