शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
2
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
3
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
5
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
6
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
7
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
8
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
9
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
10
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
11
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
12
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
13
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
14
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
15
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
16
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
17
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
18
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
19
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
20
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:38 IST

मुलाच्या फ्लॅटवर नेऊन गैरकृत्य

कोल्हापूर : कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेतील मुख्याध्यापक कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय ५५, रा. सावर्डेकर कॉलनी, मुरगुड, ता. कागल) याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला मंगळवारी (दि. १३) अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील कृष्णा दाभोळे हा कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेत मुख्याध्यापक आहे. दहावी पास होऊन आश्रमशाळेतून बाहेर पडलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीशी त्याने लगट केली. ऑगस्ट आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितला. या माय-लेकीने पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीक्षकांनी तातडीने महिला सहाय्य कक्षात तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार जुना राजवाडा पोलिसांनी मुख्याध्यापकावर बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तातडीने मंगळवारी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा अधिक तपास शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्याकडून सुरू आहे.मुलाच्या फ्लॅटवर नेऊन गैरकृत्यमुख्याध्यापक दाभोळे याचा मुलगा खासगी नोकरी करतो. त्याने कोल्हापुरात नवीन फ्लॅट घेतला आहे. रिकाम्या फ्लॅटमध्ये नेऊन मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केले. मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई होताच जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. त्याची सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Headmaster arrested for assaulting student in Ashram School.

Web Summary : A headmaster in Kolhapur was arrested for sexually assaulting a minor student. The victim reported the abuse, leading to the headmaster's arrest and police custody. The incident has caused outrage, with demands for strict legal action.