कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा सुधारित कालबद्ध कार्यक्रम तातडीने सादर करण्याची सूचना विभागीय उपनिबंधक (दुग्ध), पुणे राजकुमार पाटील यांनी सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांना पत्राद्वारे सोमवारी केली. मात्र, अवसायनाचे मध्यंतरी आदेश काढलेल्या संस्थासह की त्यांना वगळून प्रक्रिया सुरू करा, याबाबत या पत्रात स्पष्टता नसल्याने गुंता कायम राहण्याची शक्यता आहे.जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांच्या मान्यतेने ‘गोकुळ’च्या प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम सहायक निबंधक (दुग्ध) यांनी तयार केला होता. त्यानुसार ९ मार्च पासून संबधित ५४७० दूध संस्थांना ठराव मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा कार्यक्रम निश्चित केला होता. दरम्यानच्या काळात हे प्रकरण न्यायालयात गेल्याने ठराव मागविण्याची प्रक्रिया थांबल्याचे सहायक निबंधक (दुग्ध) यांनी वरिष्ठ कार्यालयास कळवले होते.
वाचा: गोकुळ संलग्न एकाही पात्र दूध संस्थेवर अन्याय होणार नाही, सहायक निबंधकांनी दिली ग्वाही
‘गोकुळ’च्या २०२६ ते २०३१ या कालावधीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी संघाची मतदार यादी तयार करणे करीता संघाच्या सभासद संस्थांचे ठराव मागविणे व त्यांचे एकत्रीकरण करून मतदार यादी तयार करण्यासाठी सुधारित कालबद्ध कार्यक्रम सोमवारीच कार्यालयास मंजुरीस्तव सादर करावा, असे पत्राद्वारे विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पूणे यांनी सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांना कळवले आहे. दरम्यान, ११०८ संस्थांसह की त्यांना वगळून प्रक्रिया सुरू करा, याबाबत पत्रात स्पष्टता दिसत नाही.
प्रदीप मालगावे पुण्याला रवानासहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे हे सोमवारी दुपारी पुण्याला रवाना झाले. ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाने निवडणुकीची केलेली मागणी आणि ११०८ दूध संस्थांबाबत अस्पष्टता आहे. याबाबत ते जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून मार्गदर्शन घेणार आहेत.
Web Summary : Divisional Deputy Registrar instructs preparing Gokul's voter list, but ambiguity persists regarding 1108 institutions under liquidation. Assistant Registrar Malgave seeks guidance from Pune authorities concerning the election process and institutional status.
Web Summary : विभागीय उप-पंजीयक ने 'गोकुल' की मतदाता सूची तैयार करने का निर्देश दिया, लेकिन 1108 संस्थानों के परिसमापन पर अस्पष्टता बनी हुई है। सहायक पंजीयक मालगावे चुनाव प्रक्रिया और संस्थागत स्थिति के बारे में पुणे अधिकारियों से मार्गदर्शन लेंगे।