शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

देखाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: September 8, 2016 00:27 IST

राजारामपुरी, उद्यमनगरात तांत्रिक देखावे : युवक मित्र मंडळाची प्लास्टिकच्या कचऱ्यापासून इंधन निर्मिती

कोल्हापूर : प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणाचा यक्षप्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून संशोधक या कचऱ्यापासून इंधननिर्मितीचा प्रयत्न करीत आहेत. असाच प्रयोग पुनर्प्रक्रियेच्या माध्यमातून डॉ. मेधा ताडपत्रीकर व शिरीष फडतरे यांनी शोधला आहे. या प्रयोगाचे सादरीकरण गणेशोत्सवानिमित्त राजारामपुरी अकरावी गल्ली येथील युवक मित्र मंडळाने सादर केले आहे. एव्हरेस्ट असो वा कुंभमेळा, कन्यागत महापर्व; सगळीकडे एकच समस्या, ती म्हणजे प्लास्टिक कचरा होय. आता तुम्ही म्हणाल, यात नवीन काय आहे? प्लास्टिक कचरा कायम होतच राहणार आहे. मात्र, प्लास्टिक १००० वर्षे तरी टिकून राहते. त्याचा निचरा किंवा विघटन होत नाही. ते निसर्गाला, माणसांना, प्राण्यांना हानीकारक आहे. त्यातून नद्या, समुद्र प्रदूषित होतात. निरनिराळे आजार, नाले तुंबणे, आदी समस्यांना आताही व यापुढेही सर्वांना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापुरातील डॉ. मेधा ताडपत्रीकर व शिरीष फडतरे यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेच्या माध्यमातून कायमचा इलाज करणारे तंत्रज्ञान शोधले आहे. याचा प्रयोग राजारामपुरी अकरावी गल्ली येथील युवक मित्र मंडळाच्या गणेश देखाव्यातून सादर केला आहे. या प्रक्रिया प्रकल्पात पुण्यातील ५५०० कुटुंबे व कॉर्पोरेट कंपन्याही सहभागी झाल्या आहेत. हा देखावा पूर्ण झाला असून बुधवारपासून सर्वांसाठी पाहण्यास खुला झाला आहे.