कोल्हापूर : असंडोली (ता. गगनबावडा) येथील गर्भवती रूपाली अमित कांबळे (२७) यांचा शुक्रवारी सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी रूपाली यांनी व्हिडिओ कॉलद्वारे गुरुवारी (दि. १) आपल्या मुली आर्वी (७) व अंतरा (३) यांच्याशी संवाद साधला होता. ‘आई, तू कधी येणार’, असा निरागस प्रश्न अंतरा हिने विचारल्यावर ‘लवकरच येते, बाळा’ असे उत्तर देणारी आई या दोन चिमुकल्यांना सोडून कायमची निघून गेली. याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.रूपाली यांचे अर्भक १३ डिसेंबरला पोटातच मयत झाले होते. सीपीआरमध्ये सिझेरिअन करून तिच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी तिचाही मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. पहिल्यांदा बाळ आणि त्यानंतर मातेचाही मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रूपाली यांचा विवाह असंडोली येथील अमित आनंदा कांबळे यांच्याशी २९ मे २०१७ रोजी झाला होता. पाचवी गर्भधारणा असलेल्या रूपाली यांना यापूर्वी दोन वेळा नैसर्गिक गर्भपाताचा सामना करावा लागला होता तशी गावातील उपकेंद्रात नोंद झाली आहे. १३ डिसेंबरला मध्यरात्री २ वाजता प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीव्र रक्तस्त्राव व संसर्गामुळे किडनीवर दाब येऊन डायलिसिस करावे लागले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अखेर शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती अमित, आर्वी (७) व अंतरा (३) या दोन चिमुकल्या मुली आहेत.वाढदिवसाचे स्वप्न अधुरे....चिमुकली अंतरा हिचा २९ डिसेंबरला वाढदिवस होता. आई घरी नसल्याने वाढदिवस साजरा करता आला नाही. आई आल्यावर वाढदिवस साजरा करण्याचे अंतराचे स्वप्न मात्र कायमचे अपूर्ण राहिले.
Web Summary : Rupali Kamble, a pregnant woman from Asandoli, Kolhapur, died during treatment at CPR hospital. She spoke to her daughters via video call shortly before, promising to return home soon. Tragically, her unborn child had died earlier, and now the mother has also passed away, leaving behind two young daughters.
Web Summary : कोल्हापुर के असंडोली की रूपाली कांबले, जो गर्भवती थीं, का सीपीआर अस्पताल में इलाज के दौरान निधन हो गया। कुछ समय पहले उन्होंने अपनी बेटियों से वीडियो कॉल पर बात की और जल्द घर लौटने का वादा किया। दुख की बात है कि उसके अजन्मे बच्चे की पहले ही मौत हो चुकी थी, और अब माँ भी चल बसीं, दो छोटी बेटियाँ पीछे छूट गईं।