शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

दुबईत नोकरी लागली, कौतुकही झालं; आई- भावासोबत जेवली अन् मग वेगळाच निर्णय घेतला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 1:03 PM

कोल्हापूरमधील सम्राटनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरमधील सम्राटनगर परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय प्रित जैन हिने आत्महत्या केली आहे

कोल्हापूर: कोल्हापूरमधील सम्राटनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रिती प्रशांत जैन या २२ वर्षीय तरुणीनं राहत्या घरी हुकाला ओढणीनं गळफास लावून आत्महत्या केली. प्रिती ही उच्च शिक्षित होती. दुबई येथे चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळाली होती. मंगळवारी प्रिती मुंबईहून दुबईला विमानानं नोकरीच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी जाणार होती. पण त्यापूर्वीच तिनं आत्महत्या करुन जीवन संपवलं. प्रितच्या या निर्णयामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रिती जैन हिच्या वडिलांचं दीड वर्षांपूर्वी निधन झालं होतं. तिच्या आईनं प्रितीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठी धडपड केली होती. तिनं हॉटेल मॅनेजमेंट आणि त्यानंतर एम.बी.ए.ची पदवी घेतली होती. तिला दुबई येथे नोकरीची ऑफर आली होती. ४ सप्टेंबरला तिला नोकरीच्या ठिकाणी हजर रहायचं होतं पण तिची फ्लाईट थोडक्यात चुकली. त्यानंतर मंगळवारी सात सप्टेंबर रोजी म्हणजे, आज तिची दुबईची फ्लाईट बुक झाली. 

फ्लाईट पकडण्यासाठी प्रिती काल, म्हणजेच, ६ सप्टेंबरला मुंबईला रवाना होणार होती. त्यासाठी तिला लागणारं साहित्य भरण्यासाठी घरी गडबड सुरु होती. बॅगेत तिचं साहित्य भरण्यासाठी तिला भाऊ आणि आईनं मदत केली. त्यानंतर दुपारी तिघांनी एकत्र जेवण केलं. दुबईत नोकरी मिळाल्यानं तिच्यावर नातेवाईक आणि मित्र मैत्रिणीकडून शुभेच्छांचा वर्षावही सुरु होता.

दुपारी जेवण झाल्यानंतर प्रिती झोपण्यासाठी घरातील वरच्या मजल्यावर गेली. त्यानंतर तिला उठवण्यासाठी घरचे गेले असता तिच्या खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिच्या भावाने दरवाजा उघडून खोलीत प्रवेश केला असता प्रितीनं फॅनच्या हुकाला ओढणीनं गळफास लावल्याचं दिसून आलं. तिला खाली उतरुन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केलं.

प्रितीनं चिट्टीत काय लिहिलं?

मृत्यूपूर्वी प्रिती जैननं लिहलेली चिठ्ठी सापडली आहे. चिठ्ठीत वडिलांच्या पश्चात शिक्षणासाठी आईला खूप त्रास झाल्याचा उल्लेख केला आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये. कोणालाही त्रास देऊ नका असा उल्लेख आहे. तिनं नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असं राजारामपुरी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू