प्रशांत कोरटकर याचा जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज, सुनावणीची तारीख निश्चित नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:15 IST2025-04-04T12:15:21+5:302025-04-04T12:15:45+5:30
कोल्हापूर : महापुरुषांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावणे, या प्रकरणातील नागपुरातील आरोपी प्रशांत कोरटकर याचे वकील ...

प्रशांत कोरटकर याचा जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज, सुनावणीची तारीख निश्चित नाही
कोल्हापूर : महापुरुषांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावणे, या प्रकरणातील नागपुरातील आरोपी प्रशांत कोरटकर याचे वकील सौरभ घाग यांनी गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अपील अर्ज केला. यावर उद्या, शनिवारी किंवा सोमवारी दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.
चौथे सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांनी मंगळवारी कोरटकर याचा जामीन अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे कोरटकर याचा मुक्काम कळंबा कारागृहात वाढला आहे. नवीन अर्जावर सरकारी वकील, पोलिस विभागातील तपास अधिकारी, फिर्यादी इंद्रजित सावंत यांचे म्हणणे घेतले जाणार आहे. त्यानंतर जामीनवर निर्णय होणार आहे.
जामीन अर्जाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात कोणत्या न्यायाधीशांसमोर चालणार हे निश्चित झालेले नाही. हे निश्चित झाल्यानंतर सुनावणीची तारीख निश्चित होईल.